गोविंदासोबत राहत नाही त्याची पत्नी सुनीता! म्हणाली, 'त्याच्याकडे रोमान्स करायला वेळ नाही; पुढच्या जन्मी तो...'

Govinda-Sunita Ahuja : गोंविदाची पत्नी सुनीता आहुजानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गोविंदा पुढच्या जन्मी नवरा म्हणून नको असं म्हटलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jan 5, 2025, 09:13 AM IST
गोविंदासोबत राहत नाही त्याची पत्नी सुनीता! म्हणाली, 'त्याच्याकडे रोमान्स करायला वेळ नाही; पुढच्या जन्मी तो...' title=
(Photo Credit : Social Media)

Govinda-Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे सगळ्यांचे लक्ष वेधते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. गोविंदा आणि सुनीताच्या लग्नाला 37 वर्षे झाले आहेत तरी त्यांची जोडी ही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असते. ते दोघं जेव्हा कोणत्या कार्यक्रमात किंवा शोमध्ये दिसायचे तेव्हा ते खूप मस्ती करायचे. तरी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजानं सांगितलं की पुढच्या जन्मी गोविंदा तिला नवरा म्हणून नकोय. गोविंदाकडे रोमान्ससाठी वेळ नाही. 

सुनीतानं 'पिंकविला'ला ही मुलाखत दिली आहे. त्यावेळी सांगताना सुनीता म्हणाली, 'आमच्या घरात दोन घरं आहेत. समोर माझा एक बंगला देखील आहे. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो... माझं मंदिर माझी मुलं सगळे. तर गोविंदाला काय, तर मीटिंगमुळे त्याला उशिर होता. त्याला गप्पा मारायला खूप आवडतं. आम्ही तिघं एका घरात राहतो, मी, माझी मुलगी आणि माझा मुलगा. आम्ही तिघं खूप कमी बोलतो कारण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही जास्त बोलता, तेव्हा आपण आपली एनर्जी वाया घालतो. काही कामाचं बोलायचं झालं तर कळतं की या फालतू गोष्टींवर चर्चा करणं मला आवडत नाही आणि नाही माझ्या मुलांना ते आवडतं आणि गोविंदा आमच्या विरुद्ध आहे. कोणी ऐरागैरा (फालतू) आला तरी तो त्याच्याशी गप्पा मारत असतो. तो कधी-कधी तर तो ऑफिसमध्ये झोपतो. त्यांना माहित आहे की मी 4 वाजता उठणार, 3 वाजता उठणार, त्याची पण झोप मोडते कारण तो 3-4 वाजता झोपतो. तोपर्यंत तो काय करतो हे माहित नाही.'

सुनीता आहूजानं पुढे सांगितलं की 'आता मला माहित नाही की तो असा झालाय की नाही. मी पुन्हा सांगते कधी कोणावर विश्वास ठेवायचा नाही. माणूस आहे की सरड्यासारखा रंग बदलतो. मी त्याला सांगितलं की मला पुढच्या जन्मी नवरा म्हणून तो नकोय. तो सुट्टीवर जात नाही. मी अशी व्यक्ती आहे जिला नवऱ्यासोबत बाहेर जाऊन रस्त्यावर पानी-पुरी खाण्याची इच्छा होते. काम करण्यात ती पूर्ण वेळ घालवते. तो त्याचा पूर्ण वेळ हा काम करण्यात घालवतो. एकही क्षण असा मला आवडत नाही जेव्हा आम्ही चित्रपट पाहायला गेलोय.'

हेही वाचा : 'मां की सेवा इस...' म्हणत करीनाने शेअर केला तैमुरचा फोटो; सर्वांकडूनच होतोय कौतुकाचा वर्षाव

सुनीता पुढे म्हणाली की 'आमच्या लग्नाला 37 वर्ष झाली. आता तो कुठे जाणार? आधी तो कधीच कुठे जात नव्हता. आता मला नाही माहित.'