'माझ्या आईला लोकांनी...', Gulshan Grover यांना पाहताच संतापलेल्या प्रेक्षकांनी केले असे काही

Gulshan Grover यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Updated: Feb 19, 2023, 05:24 PM IST
'माझ्या आईला लोकांनी...', Gulshan Grover यांना पाहताच संतापलेल्या प्रेक्षकांनी केले असे काही title=

Gulshan Grover Played Villain in Films : बॉलिवूडचे बॅड मॅन अशी ओळख निर्माण करणारे अभिनेता गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) हे आजही लोकप्रिय आहेत. गुलशन ग्रोव्हर हे 90 च्या दशकातील लोकप्रिय खलनायक होते. त्या काळात गुलशन ग्रोव्हर यांनी सगळ्यांना खलनायकांना मागे टाकलं होतं. मात्र, या सगळ्याचा त्यांच्या कुटुंबावर खूप वाईट परिणाम झाला होता. याविषयी गुलशन ग्रोव्हर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलले आहेत.  इतकंच काय तर जेव्हा गुलशन हे त्यांच्या करिअरच्या पीकवर होते तेव्हा त्यांचं करिअर संपवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. 

मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये गुलशन ग्रोव्हर यांनी हा खुलासा केला आहे. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की त्याच्या ऑनस्क्रीन भूमिकेचा त्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम झाला आहे का? इतकंच काय तर त्यामुळे त्यांच्या मित्र आणि कुटुंबाला कोणत्या गोष्टींची काळजी किंवा त्रास झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी बोलताना गुलशन ग्रोव्हर म्हणाले, "सुरुवातीला स्त्रिया त्यांच्याशी बोलताना खूप व्हायच्या आणि त्यांना अस्वस्थ वाटायचे. माझ्याघरी पार्टी असेल तर ते विचारायचे की मी माझ्यासोबत माझ्या मित्रांना घेऊन येऊ शकतो का? पण जेव्हा माझं खासगी आयुष्य पाहिलं तेव्हा त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला. या सगळ्याचे आभार इंटरनेट आणि टीव्हीला आहे."

पुढे त्यांच्या आईवर या सगळ्याचा कसा परिणाम झाला या विषयी सांगताना ते म्हणाले, एक खलनायक म्हणून मी प्रसिद्ध झालो. माझी आई रोज गुरुद्वारात जायची एकदिवस तिला तिथल्या लोकांनी थांबवले आणि विचारले की तुमच्या मुलाला काय झालं आहे? तो असा का करतोय, तो खूप चांगला मुलगा होता, सगळ्यांचा आदर करायचा अचानक असं तुम्हाला सोडून का गेला? त्यावर उत्तर देत त्या सगळ्यांना समजावत माझी आई म्हणाली तो फक्त एक अभिनेता आहे. तो दिल्ली सोडून गेला तरी देखील तो मला रोज पत्र लिहितो. 

हेही वाचा : Sunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात

पुढे त्यांच्याकडून काम काढून घेण्यासाठी निर्मात्यांनी एक अट ठेवली होती की जो पर्यंत हा चित्रपट तयार होत नाही तो पर्यंत मी कोणतीही नकारात्मक भूमिका करायची नाही. हा सगळा माझ्या प्रतिस्पर्ध्यांचा एक डाव होता ज्यांनी हे करण्यासाठी निर्मात्याला एकत्रितपणे पैसे दिले होते. माझा एक प्रतिस्पर्धी नव्हता अनेक होते. मी अनेक चित्रपटांना नकार दिला ज्या चित्रपटांमध्ये मला हीरोची भूमिका ऑफर मिळाली होती.