Elon Musk : जगातील किंबहुना या संपूर्ण विश्वातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारा एलॉन मस्क सध्या त्याच्या याच श्रीमंतीमुळं जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हाच मस्क आणखी एका कारणामुळं लक्ष वेधतोय, कारण आहे ते म्हणजे त्याचं इतर राष्ट्रांशी असणारं नातं. मस्क आणि त्याची कंपनी SpaceX वर कथित स्वरुपात अमेरिकेच्या तिन्ही सैन्यदलांकडून विविध स्तरावर तपासणी सुरू आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार मस्कनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि तत्सम परदेशी नेत्यांची भेट घेतली असून, त्यासंदर्भातील माहिती अमेरिकेला दिली नाही. ज्यामुळं आता अमेरिकेतील लष्कर मस्कची चौकशी करत असल्याचं म्हटलं जात आहे. किंबहुना एलॉन मस्कला आतापर्यंत अमेरिकेच्या वायुदलानं अधिकाधिक सुरक्षा प्रदान केली नसून, यामुळं धोका वाढण्याची शक्यता असल्यानं अमेरिकेनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
अमेरिकेतील सिनेटरच्या म्हणण्यानुसार 'मिस्टर मस्क' अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घेत असले तरीही ते शत्रू राष्ट्रातील नेत्यांशी वारंवार भेटीगाठी करत असल्यामुळं अमेरिकी लष्कराला SpaceX च्या सॅटेलाईटचा वापर करण्याचा निर्णय योग्य ठरेल का, हाच प्रश्न उपस्थितत होतो. 2022 मध्ये मस्कनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची दोनदा भेट घेतली असून, ते रशियातील काही इतर मोठ्या नेत्यांच्या संपर्कातही होते, ज्यामुळं मस्क रशियन एजंट तर नाही? हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होऊ लागला आहे.
रशियानं मात्र या गोष्टी आणि चर्चांना दुजोरा दिला नसून मस्कनंही या वृत्ताची थट्टा करत या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं X पोस्टवरून दोन हसणारे इमोजी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली. ब्लूमबर्गनं केंडलचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार स्पेस एक्सकजडे सर्व गोपनीय माहितीपर्यंत पोहोचण्याची मुभा आहे त्यामुळं आता मस्क खरंच रशियासाठी हेरगिरी करतोय की त्याचा आणखी काही मनसुबा आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.