राज कपूर असते तर करीनाची 'ही' इच्छा पूर्ण झाली असती

करीनाचा आज ४० वा वाढदिवस 

Updated: Sep 21, 2020, 09:33 PM IST
राज कपूर असते तर करीनाची 'ही' इच्छा पूर्ण झाली असती

 मुंबई : एक अशी वेळ होती जेव्हा सिनेसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्री राज कपूर यांची हिरोईन बनण्यास उत्सुक होती. राज कपूर यांच्या सिनेमांत एक ब्रेक मिळावा ही इच्छा बाळगून असायची. राज कपूर आपल्या सिनेमातून या अभिनेत्रींना लाँच करतील असा विचार असायचा. राज कपूर यांच्या कुटुंबात जन्मलेली.... त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेली करीना कपूरपण असंच काहीस स्वप्न उराशी बाळगून होती. 

करीना कपूरला देखील असंच वाटायचं की, एक दिवस ती राड कपूर यांच्या सिनेमात काम करेल. ते तिला दिग्दर्शित करतील. राज कपूर आपल्या सिनेमात करीनाला अभिनेत्री म्हणून घेतील. तिची ही इच्छा तिने सिमी ग्रेवालच्या 'Rendezvous with Simi Grewal'मध्ये बोलून दाखवली होती. 

करीना या शोमध्ये आपल्या आजोबांसोबत म्हणजे राज कपूर यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ बघून खूप इमोश्नल झाली. सिमी यांनी करीनाला तिच्या आजोबांसोबतच्या आठवणी विचारल्या होत्या. 

करीनाचा एक व्हिडिओ जो मुलाखतीत दाखवला. त्यामध्ये करीना ४ ते ५ वर्षांची दिसत आहे जी आजोबा राज कपूर यांच्या अंगावर खेळत आहे. तिथे रणबीर कपूर आणि रिद्धिमा देखील दिसत आहे. आज करीनाचा ४० वा वाढदिवस आहे. करीनाची ही इच्छा अपुरीच राहिली आहे.