'हलाल' सिनेमाचा टिझर प्रदर्शित

 'तलाक'वर भाष्य करणारा हलाल सिनेमाचं टीझर आज यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Updated: Aug 13, 2017, 01:59 PM IST

मुंबई :  'तलाक'वर भाष्य करणारा हलाल सिनेमाचं टीझर आज यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे टीझर पाहिल्यावर तलाक आणि त्याचा मुस्लिम स्त्रिया त्याचा कसा सामना करतात, यावर आधारीत हलाल असल्याचं दिसून येत आहे. 

या चित्रपटाला विरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, कारण अतिशय गंभीर विषयावर भाष्य करणारा हलाल सिनेमा आहे, तलाक पद्धत बंद करण्यालाही अनेक वेळा विरोध होताना दिसत आहे, अशा वेळी हा सिनेमा आल्याने यावर चर्चा होणार हे नक्कीच.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे, तर अमोल कांगे हे निर्माते आहेत.