ही अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यावर अशीच फिरत होती, कोणी ओळखलं देखील नाही

मुंबईकर आपल्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना आजुबाजुला होणाऱ्या घटनेकडे लक्ष देण्यास वेळ देखील नसतो. सतत धावत असणाऱ्या मुंबईकरांना एका अभिनेत्रीला ओळखता देखील आले नाही.

Updated: Nov 11, 2017, 05:23 PM IST
ही अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यावर अशीच फिरत होती, कोणी ओळखलं देखील नाही title=

मुंबई : हॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मुंबईला आली होती. मुंबईला आल्यावर तिला खूप आनंद झाला. तिने ही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केली.

 बॉड गर्लच्या नावाने प्रसिद्ध असलेली हेले बेरी ही मुंबईच्या रस्त्यांवर एकटीच फिरत होती. पण तिला कोणीच ओळखू शकले नाही. बेरीने मुंबईच्या रस्त्यावरील अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

हेले एका खाजगी प्रोग्रामसाठी मुंबईला आली होती. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झालाही ती भेटली. सोशल मीडियावर हॅले सोबतचा फोटो दियाने शेअर केला आहे.

हॅले बेरीला मुंबई शहर खूप आवडले. पण सतत धावणाऱ्या मुंबईकरांना तिला ओळखताच आले नाही.