झगमगत्या विश्वातील आणखी एक कपल विवाहबंधनात; लग्नाचे Photo Viral

लग्नानंतर सेलिब्रिटी कपलवर खिळल्या सर्वांच्या नजरा; अनेक वर्ष डेट केल्यानंतर अडकले विवाहबंधनात   

Updated: Dec 5, 2022, 08:44 AM IST
झगमगत्या विश्वातील आणखी एक कपल विवाहबंधनात; लग्नाचे Photo Viral

Hansika Motwani Sohael Khaturiya Marriage : सध्या झगमगत्या विश्वात हग्नाचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटी कपल त्यांच्या नात्याला नवीन ओळख देत आहेत. अनेक वर्ष डेट केल्यानंतर आणखी एक कपल लग्नबंधनात अडकले आहेत. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani)  आणि उद्योगपती सोहेल कथूरिया (Sohael Khaturiya) यांनी लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हंसिका आणि सोहेल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर मोठ्या थाटामाटात त्यांनी लग्न केलं. दोघांनी कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. वधूच्या वेशात हंसिका सुंदर तर वराच्या वेशात सोहेल रुबाबदार दिसत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु होत्या. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. हंसिका मोटवानी हिने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. बाल कलाकार म्हणून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. आता ती सोहेल कठुरिया (Sohail Kathuria) सोबत लग्न करून अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

सोहेलने कसं केलं हंसिकाला प्रपोज

सोहेल कठुरिया याने पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज (Sohail Kathuria proposed Hansika Motwani) हंसिकाला प्रपोज केलं. जेव्हा सोहेलने हंसिकाला प्रपोज केलं तेव्हाचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

अभिनेत्री Hansika Motwani अडकणार विवाहबंधनात, पाहा कोण आहे तिचा होणारा पती?

रिपोर्ट्सनुसार, हंसिका आणि सोहेल कठुरिया काही काळापासून चांगले मित्र आहेत. ते व्यावसायिक भागीदार देखील आहेत. वृत्तानुसार सोहेल हा मुंबईस्थित उद्योजक आहे. एकत्र काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले.