Happy Birthday Nana Patekar : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता

आजवरच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.    

Updated: Jan 1, 2021, 09:44 AM IST
Happy Birthday Nana Patekar : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता title=

मुंबई : 'क्रांतावीर', 'वेलकम', 'तिरंगा', 'पक पक पकाक ', 'नटसम्राट', 'परिंदा' अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. कला विश्वात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी प्रचंड खस्ता खाल्ला. अभिनय विश्वात काही कलाकार त्यांच्या अभिनयामुळे तर काही मात्र त्यांच्या नावामुळे ओळखले जातात, पण यातच एक वर्ग असा असतो जो आपलं नाव आणि अभिनयाची कला या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अधिकाधिक संपन्न करत असतो. अशाच काही चेहऱ्यांपैकी असणारं एक नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांचं.

एक कलासत्क अभिनेता म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाना, असंच अनेकांचं म्हणणं आहे. अशा या अभिनेत्याला त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तर आजपर्यंत ज्यांनी प्रेक्षकांच्यामनावर अधिराज्या गाजवलं आहे, अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेवू काही गोष्टी...

*अभिनयासोबतच लेखन, चित्रपट निर्मिती या क्षेत्रांमध्येही ते सक्रिय आहेत. 

*वडिलांचा व्यवसाय बंद झाला तेव्हा नानांनी काम करण्यास सुरुवात केली. रोज ३५ रुपये आणि एक वेळचं जेवण असा त्यांच्या कमाचा मोबदला होता. 'इंडिया टीव्ही न्यूज'च्या वृत्तानुसार नानांनी सुरुवातीच्या काळात झेब्रा क्रॉसिंग आणि चित्रपटांचे पोस्टर रंगवण्याचंही काम केलं. 

*'प्रहार' या चित्रपटासाठी नानांनी जवळपास तीन वर्षे सैन्यदलाचं प्रशिक्षण घेतलं होतं. ज्यासाठी त्यांना कॅप्टन या रँकने सन्मानित करण्यात आलं होतं. 

*चित्रपटांच्या दुनियेत मनापासून रुळणाऱ्या नानांना विविध पदार्थ बनवण्याचीही आवड आहे. 

*शेतकरी वर्गाच्या हितासाठी आणि बऱ्याच समाजोपयोगी कामांसाठी नाना सतत झटत असतात. 

*आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक पात्रात जीव ओतून ते तितक्याच समर्पकपणे प्रेक्षकांसमोर सादर करणारे नाना पाटेकर हे प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवतात.