Happy Birthday : विकी कौशलचा अभियंता ते अभिनेत्यापर्यंतचा प्रवास

विकीने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजीनियर म्हणून पदवी घेतली आहे.

Updated: May 16, 2020, 05:39 PM IST
Happy Birthday : विकी कौशलचा अभियंता ते अभिनेत्यापर्यंतचा प्रवास title=

मुंबई :  'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातून स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता विकी कौशल आज ३२वा वाढदिवस साजरा करत आहे.  १६ मे १९८८ मध्ये मुंबईत विकीचा जन्म झाला. विकीला लहानपणापासून डान्सिंग आणि अॅक्टिंगची आवड होती. अभिनेता होण्याआधी विकी इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता. त्याने २००९ साली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजीनियर म्हणून पदवी घेतली आहे.

इंजिनियरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विकीला नोकरीसाठी अनेक ऑफर येत होत्या. कॉलेजमध्ये असताना एका नोकरीसाठी विकीने इंटरव्ह्यू दिला होता. कधीही यात करियर करायचं नसतानाही नोकरीत येणाऱ्या दडपणाचा अनुभव घेण्यासाठी हा इंटरव्ह्यू दिला आणि त्या नोकरीसाठी त्याला ऑफर लेटरही देण्यात आलं. पण नोकरी करण्यात रस नसल्याने त्याने नोकरीच्या अनेक ऑफर नाकारल्या.

नोकरीच्या अनेक ऑफर्स नाकारून त्याने अभिनयाच्या दिशेने प्रवास सुरू केला, आणि आज त्याने प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत आपले नाव उमटवलं आहे. उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातून त्याने चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले. यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

२०१० मध्ये विकीने अनुराग कश्यप यांच्या 'गॅग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 'मसान' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये करियरची सुरुवात केली. 'मसान'मधील भूमिकेसाठी विकीला सर्वोत्कृष्ट पदार्पण - अभिनेता हा पुरस्कारही देण्यात आला आहे.

सध्या त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत जोडण्यात येत आहे. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. शिवाय एका चॅट शोमध्ये कतरिनाने विकीसोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. परंतु अद्यापही त्यांच्या नात्याचं गुपित गुलदस्त्याच आहे.