'आज मी जे काही आहे...' हार्दिक जोशीची 'त्या' व्यक्तीसाठी खास पोस्ट

Hardik Joshi Emotional Post : अभिनेता हार्दिक जोशी सध्या नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवा शो आणि नव्या रुपात दिसणाऱ्या हार्दिकने सोशल मीडियावर एख भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 25, 2023, 03:18 PM IST
'आज मी जे काही आहे...' हार्दिक जोशीची 'त्या' व्यक्तीसाठी खास पोस्ट  title=

Hardik Joshi New Show : मराठमोळा अभिनेता हार्दिक जोशी सध्या आपल्या आगामी शोमुळे चर्चेत आहे. झी मराठी 'जाऊ बाई गावात' हा नवा कोरा शो घेऊन हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यानच हार्दिक जोशीने या रिऍलिटी शो संदर्भात एक खास अशी भावूक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये हार्दिक जोशीने एका व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच त्याने एक खास योगायोगही शेअर केला आहे. अनेकदा आपल्या व्यक्तीचं जीवनात नसणं मान्य करणे खूप कठीण असते. अशावेळी भावना शब्दात मांडून व्यक्त होणे अत्यंत गरजेचे असते. 

हार्दिक जोशीची भावूक पोस्ट 

अभिनेता हार्दिक जोशीने आपल्या ज्योती वहिनीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ज्योती वहिनी यांचे निधन झाले आहे. पण आज हार्दिक जे काही आहे त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगतो. एवढंच नव्हे तर या शो संदर्भात त्यांनी हार्दिककडून एक वचन घेतलं होतं.  ज्यामुळे त्याने हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. 

योगायोग 

हार्दिक जोशीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक योगायोग सांगितला आहे. ज्योती वहिनी यांचा वाढदिवस आणि जाऊ बाई गावात.. या शोची प्रसारित तारीख एकच आहे. हा निव्वळ योगायोग आहे. 
हार्दिकने भावूक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर अनेकांनी वहिनींना श्रद्धांजली वाहिली आहे. 

जीवनात आपण जे काही यश गाठतो त्यामागे आपली मेहनत तर असतेच पण अशा अनेक व्यक्तींचा आशिर्वाद आणि त्यांचे प्रेम असते. हार्दिक जोशीच्या या पोस्टने वहिनीची त्याच्या मनात किती कृतज्ञता आहे, हे देखील स्पष्ट दिसते. 

हार्दिक जोशीची भावूक पोस्ट 

नवा शो 

झी मराठीच्या जाऊ बाई गावात या नव्या रिऍलिटी शो ने लोकांमध्ये  उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो ह्या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे. कधी ना पहिला असा एक रिऍलिटी शो त्यांच्या भेटीस येणार आहे ज्याची ते अतुरतेने वाट पाहत असतानाच  'जाऊ बाई गावातच' शीर्षक  गीताचं टीझर झी  मराठीने आपल्या  सोशल मीडियावर  शेअर  केल  आहे. हार्दिक जोशीचा गावराण अंदाज ह्या टिझरमध्ये  पाहायला  मिळतोय. फक्त गाण्याच्या  टीझरने इतकी खळबळ निर्माण केली आहे, तर काय होईल जेव्हा पूर्ण गाण्याचा विडिओ  लोकांसमोर येईल. आता वाजणार अन गाजणार !!

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x