उर्वशीच्या घरी 'पाहुणा'; पुन्हा एकदा अफेअरची चर्चा

या व्यक्तीसोबत जोडलं जातंय नाव 

Updated: Nov 26, 2019, 12:44 PM IST
उर्वशीच्या घरी 'पाहुणा'; पुन्हा एकदा अफेअरची चर्चा  title=

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं अगदी सुरूवातीपासून खास नातं राहिलं आहे. या दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती कधी त्यांच्या ग्लॅमरमुळे तर कधी अफेअर्समुळे चर्चेत असतात. अशी चर्चा सुद्धा अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांची सुरू आहे. यामागचं कारण देखील तसंच खास आहे. 

उर्वशीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्वशी छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लासोबत दिसत आहे. उर्वशीला ही भेट 'पागलपंती' सिनेमातील उत्तम अभिनयाकरता भेट म्हणून दिला आहे. आपल्या कुटुंबात सहभागी झालेल्या या नव्या पाहुण्यासाठी उर्वशी प्रचंड खूप आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

PAGALPANTI  #love #UrvashiRautela #pets #dogsofinstagram #Pagalpanti

A post shared by URVASHI RAUTELABIMAR DI (@urvashirautela) on

या कुत्र्याच्या पिल्लाची जोरदार चर्चा रंगत आहे. त्यामागचं कारण असं की, या कुत्र्याचा फोटो या अगोदर खेळाडू हार्दिक पांड्याच्या इंस्टाग्रामवर पाहण्यात आला होता. यावरून असा अंदाज वर्तवला जातोय की, हार्दिक पांड्याने 'पागलपंती' सिनेमाचं कौतुक करण्याकरता हा कुत्रा उर्वशीला भेट म्हणून दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Keep your furry friends close this Diwali 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

कारण या दोन्ही फोटोतील कुत्र्याचं पिल्लू एकसारखं दिसत असून या अगोदरही उर्वशी आणि हार्दिकच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण उर्वशीने या सगळ्य अफवा असल्याचं सांगून विषय टाळला. 2018 मध्ये या दोघांना एका पार्टीत एकत्र पाहण्यात आलं. यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली. तसेच उर्वशीने तिच्या इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे फोटो शेअर केले होते. यानंतर या चर्चांना उधाण आलं होत.