दोन घटस्फोटांनंतर माझ्याशी लग्न, 13 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत! टीव्हीच्या कृष्णाची खदखद

 अभिनेते नितीश भारद्वाज प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं वैवाहिक जीवन चर्चेत आहे.

Updated: Mar 26, 2024, 01:03 PM IST
दोन घटस्फोटांनंतर माझ्याशी लग्न, 13 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत! टीव्हीच्या कृष्णाची खदखद title=

मुंबई : महाभारत या मालिकेतून घरा-घरात पोहचलेले अभिनेते नितीश भारद्वाज नेहमीच त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. जितक्या त्यांच्या भूमिका चर्चेत असतात. तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं वैवाहिक जीवन चर्चेत आहे. नितीश यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त पत्नी आयएएस  अधिकारी स्मिता घाटे विरोधात पोलिसात धाव घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होण्याआधीच पत्नीने शारिरीक संबध ठेवण्यापासून नकार दिल्याचा इतकंच नाहीतर बरेच आरोप नितीश भारद्वाज यांनी पत्नीवर केले आहेत. 

नुकतीच नीतीश भारद्वाज यांनी टाइम्स नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केलेत. दिलेल्या मुलाखतीत नितीश भारद्वाज म्हणाले, "मी जुन्या विचारसरणीचा आहे, असं स्मिताला जगाला दाखवायचं होतं. स्मिता सस्पेंड झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली होती. त्यावेळी मी स्वत: तिला पाठिंबा दिला. स्मिताला घरी बसवायचं असतं तर मी तिला कधीच पाठिंबा दिला नसता. माझ्यासोबत लग्न करण्याआधी स्मिताचे दोन घटस्फोट झाले होते. पण त्यावेळी लोकांनी मला तिच्यासोबत संसार थाटण्याचा सल्ला दिला". 

अभिनेता पुढे म्हणाला की,"2012 मध्ये आम्हाला जुळी मुलं झाली. प्रेग्नंट झाल्यानंतर स्मिताने पुण्यात एक घर विकत घेतलं होतं. इंडस्ट्रीतील लोकांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे स्मिताच्या नावावर मी ते घर घेतलं होतं. पण या घराचे पैसे मी देत होतो. मात्र तरिही स्मिताने फक्त तिच्या एकटीच्या नावावर मला हे घर करायला लावलं. 

नितीश भारद्वाज पुढे म्हणाले, "स्मिताचा स्वभाव खूप वेगळा होता. तिला पती-पत्नी हे रिलेशन नको होतं. पण तरी तिला लग्न का करायचं होतं हे मला कळलं नाही. आतापर्यंत तीन वेळा तिने लग्न केलं आहे. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत. मी तिच्याजवळ गेल्यावर ती वेगळ्या खोलीत जायची. मुलं माझ्यासोबत येऊन झोपायची. शारीरिक संबंध ठेवण्यास ती नेहमीच नकार देत असे. पुढे मुलांना भेटण्यासही ती नकार देऊ लागली. व्हॉट्सअॅपवर तिने मला ब्लॉक केलं होतं आणि मी तिला ब्लॉक केलंय असं तिने मुलांना सांगितलं. मुलांसोबत तिने मला वेळ घालवू दिला नाही. स्मिताला फक्त माझे पैसे हवे होते. मी एटीएम कार्ड नाही तर एक व्यक्ती आहे. स्मितासारखे माझे मुलं होऊ नयेत, असं मला वाटतं.'' असा धक्कादायक खुलासा नितीश भारद्वाज यांनी दिलेल्या मुलाखतीत केला.