रक्ताच्या थारोळ्यात पडलेली 'हसीन दिलरुबा'

'हसीन दिलरुबा' चित्रपट १८ सप्टेंबर २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार 

Updated: Dec 17, 2019, 07:41 PM IST
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली 'हसीन दिलरुबा' title=

मुंबई : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. परंतु चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तापसीच्या तोंडावर पडदा टाकण्यात आला आहे. आता चित्रपटात तापसीची वेशभूषा आणि तिचा मेकअप कसा असेल, याची उत्कंठा आता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. 

पोस्टरमध्ये एका मुलीचे पाय रक्तात आहेत. तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्या देखील आहेत. त्याचबरोबर रक्ताने भरलेला चाकू देखील तिच्या शेजारी असल्याचे दिसत आहे. तिच्या पाठी एक 'वहशी' नावाचं पुस्तक सुद्धा आहे. 'हसीन दिलरुबा' चित्रपट १८ सप्टेंबर २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.  

चित्रपटामध्ये तापसी अभिनेता विक्रांत मॅसीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन विनी मॅथ्यू करणार आहेत. खुद्द तापसीने चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'हसीन दिलरूबा' गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.

यंदाच्या वर्षी तापसी 'सांड की आंख', 'मिशन मंगल' आणि 'बदला' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. पुढच्या वर्षी ती अनुभव सिन्हाच्या 'थप्पड' आणि भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या बायोपिकच्या माध्यमातून चाहत्यांच्या भोटीस येणार आहे