मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीवर अनेककाळ राज्य केलं आहे. हेमा मालिनी यांना त्यांच्या सौंदर्यामुळे 'ड्रीम गर्ल' म्हटलं जातं. हेमा मालिनीने अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले. हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत. हेमा मालिनी यांना आपल्या मोठ्या मुलीसाठी आपल्या पसंतीचा मुलगा हवा होता. आणि ईशा त्या पसंतीचा स्वीकार करेल असं त्यांना वाटत होतं.
हेमा मालिनी यांना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याला आपला जावई बनवायचा होता. हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तसेच धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्यात चांगल नातं आहे.
हेमा मालिनी या अमिताभ यांच्या चांगल्या मैत्रीणही आहेत. हेमा मालिनी यांना त्यांच्या मैत्रीचे नात्यात रूपांतर करायचे होते. हेमा मालिनी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला तसेच त्यांचा मुलगा अभिषेक याला ओळखत होत्या. अभिषेक बच्चन सुसंस्कृत आणि चांगला मुलगा आहे. त्यामुळेच हेमा मालिनी यांना त्यांनी आपल्या कुटुंबाचा एक भाग व्हावे असे वाटत होते.
हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलला मात्र हे पटले नाही आणि तिने अभिषेकसोबत लग्न करण्यास नकार दिला. ईशा अभिषेकला भाऊ म्हणून पाहते. आणि याच कारणामुळे त्याने लग्नाला नकार दिला होता. यानंतर ईशा देओलने तिच्या बालपणीच्या मित्राशी लग्न केले. ईशा देओलचा नवरा बिझनेसमन आहे. त्याचवेळी अभिषेक बच्चनने मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसोबत लग्न केले.