Indian Cricketer : 2024 या वर्षी विराट कोहली, रोहित शर्मा, सरफराज खान असे अनेक भारतीय क्रिकेटर्स बाबा झाले. या लिस्टमध्ये आता वर्ष अखेरीस अजून एका क्रिकेटरच नाव समाविष्ट झालं आहे. भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल (Axar Patel) याची पत्नी मेहा पटेल हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 24 डिसेंबर रोजी अक्षर पटेलने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली.
अक्षर पटेल पूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये विराट कोहली हा दुसऱ्यांदा बाबा झाला. त्याने आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले. ऑक्टोबर महिन्यात भारताचा युवा क्रिकेटर सरफराज खान हा पहिल्यांदा बाबा झाला. तर टीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार असणारा रोहित शर्मा देखील डिसेंबर महिन्यात बाबा झाला. त्याने आपल्या मुलाचं नाव 'अहान' असं ठेवलं. त्यानंतर आता अक्षर पटेलची देखील 2024 मध्ये बाबा होणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सच्या क्लबमध्ये एंट्री झाली आहे.
अक्षर पटेलने 26 जानेवारी 2023 रोजी त्याची मैत्रीण मेहा हिच्याशी लग्न केलं होतं. दोघांचं लग्न गुजरातमधील बडोदा येथे झालं. क्रिकेटर अक्षर पटेलची पत्नी मेहा ही डेंटिस्ट आहे आणि सध्या ती गुजरातमध्ये प्रॅक्टिस करते. अक्षर पटेलने आपल्या मुलाचा फोटो पोस्ट करताना त्याच नाव देखील सांगितलं आहे. 19 डिसेंबर रोजी अक्षर पटेलच्या मुलाचा जन्म झाला असून या गोंडस बाळाचं नाव 'हक्श' असं ठेवण्यात आलं आहे. हक्श हे एक हिंदू नाव असून याच अर्थ 'डोळे' असा होतो.
He's still figuring out the off side from the leg, but we couldnt wait to introduce him to all of you in blue. World, welcome Haksh Patel, India's smallest, yet biggest fan, and the most special piece of our hearts.
19-12-2024 pic.twitter.com/LZFGnyIWqM— Axar Patel (akshar2026) December 24, 2024
मुंबईतील 'या' ठिकाणी आहे विनोद कांबळीचं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल, पाहा Photos
मुलाचं जन्म झाल्याने कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्यासाठी अक्षर पटेलने क्रिकेटमधून ब्रेक घेतला. सध्या अक्षर पटेल विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुजरातकडून खेळत होता. पण मुलाचा जन्म झाल्यावर त्याने गुजरात संघाच्या वरिष्ठांना सांगून थोड्या दिवस ब्रेक घेतला आहे. तसेच याच कारणामुळे अक्षर पटेल ऑस्ट्रेलियालाही गेला नाही. आर अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अश्विनच्या जागी अक्षर पटेल याला संधी मिळू शकत होती. परंतु अक्षरला नुकतंच बाळ झाल्याने मुंबई संघातील 26 वर्षीय तनुष कोटियान याला अश्विनची रिप्लेसमेंट म्हणून निवडण्यात आले.