बेडरुममधील 'तो' फोटो हिना खानकडून शेअर; सोशल मीडियावर एकच चर्चा...

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी हिना खानला आता कोणात्याही विशेष ओळखीची गरज नाही

Updated: Apr 23, 2022, 07:40 PM IST
बेडरुममधील 'तो' फोटो हिना खानकडून शेअर; सोशल मीडियावर एकच चर्चा... title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खानने इंडस्ट्रीत फक्त आणि फक्त स्वबळावर स्वत:चं उच्च स्थान मिळवलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी हिना खानला आता कोणात्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने केवळ आपल्या जबरदस्त अभिनयानेच लोकांचं लक्ष वेधून घेतलं नाही, तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
हिना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिची बोल्ड स्टाइल पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते वेडे आहेत. हिनाने तिचे बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा पुन्हा वाढवला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन लूक शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

>

हिनाने दाखवला बेडरूममधील लूक 
यामध्ये ती लाईट गुलाबी रंगाचा सॅटिनचा नाईट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हिनाने तिचे हे फोटो बेडरूममधून शेअर केले आहेत. मोकळे केस आणि विना मेकअप असा सिंपल लूक फोटोत आपल्याला पाहायला मिळत आहे. हिना खानचा चेहरा ग्लो करत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री अगदी साध्या लूकमध्ये दिसत असली तरी तिची स्टाइल कोणालाही नशेत टाकू शकते.