स्टेजवर पडता पडता वाचली अभिनेत्री, कार्तिक आर्यनने असं सावरलं Watch Video

डिझाइनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक अभिनेत्री स्टेजवरच ....

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 3, 2024, 10:13 AM IST
स्टेजवर पडता पडता वाचली अभिनेत्री, कार्तिक आर्यनने असं सावरलं Watch Video

लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा फॅशन शो सर्वत्र चर्चेचा विषय आहे. 'नमो भारत: वॉक फॉर करेज, वॉक फॉर सर्व्हिस आणि वॉक फॉर हेरिटेज' या कार्यक्रमात मनोरंजन जगतातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सोनाली बेंद्रे, ताहिरा कश्यप, कार्तिक आर्यन, हिना खान आणि तृप्ती डिमरी सारख्या सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान, हिना खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यन तिला चक्क सावरताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. मात्र अभिनेत्रीने रॅम्पवर शानदार वॉक करताना दिसली. सोशल मीडियावर या कार्यक्रमाची अनेक झलक समोर येत असतानाच हिना खानचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हिना कार्तिक आर्यनला भेटताना दिसत आहे. आधी तिने कार्तिक आर्यनला मिठी मारली आणि नंतर तिचा तोल गेला. कार्तिकने मात्र तिला तेवढ्यातच सावरलं आणि तिची काळजी घेतली. हिना जवळजवळ स्टेजवर पडली असती. या व्हिडीओनंतर चाहते हिनाची काळजी तर व्यक्त करत आहेत. सोबतच आर्यनचं कौतुकही होत आहे. 

हिना खान थोडक्यात बचावली

पिंकविलाने शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हिनाचे धैर्य आणि संयम न गमावल्याबद्दल तिचे कौतुक केले. एका युझरने लिहिले की, 'एवढ्या कठीण काळात शांततेने आणि सन्मानाने आणि इतक्या धैर्याने स्वत:ला हाताळल्याबद्दल तिचे अभिनंदन. हिना शेरखान आहे, लवकर बरी हो! तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहात.

कार्यक्रमात हिनाचीच चर्चा 

कॅन्सरच्या उपचारादरम्यान हिना खानने जेव्हा रॅम्प वॉक केला तेव्हा ती एक उदाहरण बनली. इव्हेंटसाठी तिने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला होता, त्यावर जरी क्लिष्ट जरी काम केले होते. तिने ते पारदर्शक दुपट्ट्यासोबत जोडले. हिनाने स्टेटमेंट कानातले, गजरा, बांगड्या आणि काही अंगठ्यांवी तिचा लूक पूर्ण केला. तिने ग्लॅमरस मेकअपने तिचा लूकही वाढवला आहे.

हिना खानचा कॅन्सरवर उपचार सुरु 

हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सतत वेदना सहन करण्यापासून ते केमोथेरपी घेण्यापर्यंत, तिने बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे परंतु तिच्या धैर्यवान व्यक्तिमत्त्वाने लोकांना प्रेरणा देत आहे. हिनाचे चाहते तिला सतत पाठिंबा देत आहेत. हिनाची होतेय चर्चा. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More