गणेश मूर्तीसमोर बूट... ट्रोलर्सच्या निशाण्यावर हिना खान

 'लाज वाटत नाही का... गणेश मूर्तीसमोर शूज घालून उभं राहायला'

Updated: Aug 14, 2018, 11:34 AM IST
गणेश मूर्तीसमोर बूट... ट्रोलर्सच्या निशाण्यावर हिना खान title=

मुंबई : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री हिना खान अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. हिनानं सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं तरी तिला ट्रोल न करण्याची एक संधी सोडतील ते ट्रोलर्स कसले... असंच पुन्हा एकदा घडलंय... अर्धसत्य पाहत ट्रोलर्स सोशल मीडियावर हिना खानवर तुटून पडलेत. 

हिना सध्या बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत नाशिकमध्ये फिरतेय. तिथल्या एका रिसॉर्टचे काही फोटो रॉकीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये एक असा फोटो आहे ज्यात हिना आणि रॉकी गणेश मूर्तीसमोर बूट परिधान करून सेल्फी काढताना दिसत आहेत. या फोटोवरून ट्रोलर्स आणखीन एक संधी मिळालीय. 

 

We continue to have an amazing time in this beautiful winery called @somavinevillage @regentaresortssomavinevillage #RoyalOrchidHotels Thank you so much for such a wonderful treatment and mind blowing hospitality. Look forward to visit again soon.

A post shared by Rocky Jaiswal (@rockyj1) on

हिना आणि रॉकीच्या या फोटोवर एका युझरनं म्हटलंय, 'लाज वाटत नाही का... गणेश मूर्तीसमोर शूज घालून उभं राहायला'

ट्रोलर्सच्या कमेंट पाहून हिनाच्या एका फॅन क्लब अकाऊंटवरून आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय... हिना - रॉकीला उगाचच ट्रोल केलं जात असल्याचं यात म्हटलंय. 

या अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओत म्हटलंय... 'हे दोघं जिथे उभे आहेत... तो एक रिसेप्शनसमोरचा येण्या-जाण्याचा रस्ता आहे... मंदिर नाही. दोघंही समजूतदार आहेत, त्यांना माहीत आहे ते काय करत आहेत' 

हिना खान लवकरच एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की २'मध्ये कमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.