Maharashtra Goa Border : भारतात एक असे राज्य आहे ज्या राज्यात फक्त दोनच जिल्हे आहेत. भारतातील लहान राज्यांच्या यादीत राज्याचे नाव आहे. फक्त दोनच जिल्हे असलेले हे राज्य फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले गोवा राज्य. गोवा हे एक लोकप्रिय टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. जाणून घेऊया गोव्यात पर्यटक मोठ्या संख्याने का फिरायला येतात.
गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. देशाच्या नैऋत्य असलेले गोवा राज्य जगभर प्रसिद्ध आहे. गोव्याला अथांग समुद्र किनारा लाभलेला आहे. सुंदर समुद्र किनारे आणि नाईट लाईफ यासह चर्च तसेच प्राचीन मंदिरांसाठी देखील गोवा प्रसिद्ध आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे फक्त दोन जिल्हे गोव्यात आहेत.
रेइस मॅगोस किल्ला: पंजीममधील हा किल्ला 16 व्या शतकातील पोर्तुगीज किल्ला आहे. हा गोव्यातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे.
कोल्वा बीच : कोलवा बीच हे गोव्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे मोठ्या संख्येने बार आणि नाइटक्लब आहेत. पोर्तुगीज घरे आणि व्हिला देखील आहेत. यासह येथे पॅराग्लायडिंग, जेट स्कीइंग, स्नॉर्कलिंग, स्पीड बोट राइड, वॉटर स्कूटरिंग, पॅरासेलिंग आणि बनाना बोट राइड यांसारख्या काही रोमांचक जलक्रीडांचा देखील अनुभव घेता येतो.
अरामबोल बीच: उत्तर गोव्यातील सर्वात छान समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. हे गोव्यातील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे.
बागा बीच : बागा बीचे हे नाईटलाइफ अनुभवण्यासाठी गोव्यातील हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
अंजुना बीच हे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. अंजुना बीच हा गोल्डन बीच म्हणून ओळखला जातो.
बटरफ्लाय बीच गोव्याच्या कानाकोना जिल्ह्यात पालोलेमच्या दक्षिणेला आहे. गोव्यातील ही सर्वात रोमँटिक प्लेस मानली जाते. यामुळेच याला हनीमून बीच असेही म्हटले जाते.
दूधसागर धबधबा: 310 मीटर उंचीवरुन कोसळणारा दूधसागर धबधबा हा देशातील सर्वात उंच धबधबा गोव्यातच आहे.