प्रसिद्धी असो किंवा पैसा, Hindustani Bhau सेलिब्रिटींनाही देतो चांगलीच टक्कर

इंस्टाग्रामवर आहेत अर्धा दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स

Updated: Jan 31, 2022, 10:38 PM IST
 प्रसिद्धी असो किंवा पैसा, Hindustani Bhau सेलिब्रिटींनाही देतो चांगलीच टक्कर title=

मुंबई : विकास जयराम फाटक आज हिंदुस्थानी भाऊ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. तो एक टिकटॉक स्टार आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यक्ती आहे. इंस्टाग्रामवर त्याचे अर्धा दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

लोकप्रियता कशी मिळाली?

हिंदुस्थानी भाऊने आपल्या कारकिर्दीला अगदी लहान वयात सुरुवात केली. शाळा सोडल्यानंतर त्याने खार जिमखान्यात बॉल बॉय म्हणून काम केले. जिथे तो दिवसाला 20 रुपये कमवायचा आणि ट्रेनमध्ये अगरबत्ती विकायचा. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि 'पहली फुरसात में निकल' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला.

यूट्यूबर असण्यासोबतच तो मुंबईतील 'दक्ष पोलिस टाईम्स' या स्थानिक वृत्तपत्रात न्यूज रिपोर्टर म्हणूनही काम करतो. 2011 मध्ये त्याला मुंबईतील 'बेस्ट चीफ क्राइम रिपोर्टर'चा पुरस्कारही मिळाला होता. त्याने 'आदित्य युवा प्रतिष्ठान' या एनजीओची स्थापना केली, जी त्याच्या मुलाच्या नावावर आहे आणि 'संकल्प युवा प्रतिष्ठान'चा सदस्य आहे.

भाऊने बिग बॉस सीजन 13 मध्ये भाग घेतला होता. वाईल्डकार्ड स्पर्धक म्हणून त्याने 36 व्या दिवशी घरात प्रवेश केला आणि 78व्या दिवशी घराबाहेर पडला. बिग बॉसचा भाग बनल्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदुस्थानी भाऊची एकूण संपत्ती 1.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, जी भारतीय चलनात सुमारे 130 कोटींच्या समतुल्य आहे. रिपोर्टरची नोकरी आणि यूट्यूब चॅनल हेच त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

भाऊ पत्नी आणि मुलासोबत मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतो. हिंदुस्थानी भाऊला  कार आणि बाईक्सची खूप आवड आहे, त्याच्याकडे Yamaha R15, Royal Enfield आणि Suzuki Ertiga अशा गाड्यांचे कलेक्शन आहे.

Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.