रायगडाची 'ती' शिकवण नाही विसरली सोनाली

होणाऱ्या पतीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...   

Updated: Jul 21, 2020, 08:46 AM IST
रायगडाची 'ती' शिकवण नाही विसरली सोनाली title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो आणि अर्थातच पुढे जाऊन, कळत न कळत याच शिक्षणाचा बहुविध मार्गांनी आपल्याला फायदाही होत असतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिलाही अशीच काहीशी प्रचिती आली आहे. हिरकणी या अतिशय गाजलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सोनालीनं काही महत्त्वाच्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं होतं. रायगडाच्या कुशीत असणाऱ्या खेड्यामध्ये तिला मिळालेली हीच शिकवण आज अनोख्या पद्धतीनं उपयोगात आली आहे. 

खुद्द सोनालीनंच याबाबतचा व्हिडिओ पोस्ट करत त्या आठवणीला उजाळा दिला. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सोनालीनं त्यात 'किल्ले रायगड', या ठिकाणाचा उल्लेख केला. 'आधी हाताला चटके तवा इंडक्शनवर भाकर', असं लिहिचत तिनं हा व्हिडिओ सर्वांच्या भेटीला आणला. 

सोनालीचं हे कॅप्शन वाचून तुम्हाला अंदाज आला असावा की, तिला रायगडावर नेमकी कोणती शिकवण मिळाली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सोनाली भाकरी थापायला शिकली होती. रायगडावरीलच एका छोट्याश्या झोपडीत तिनं ही कला शिकल्याचंगी सांगितलं. आज तोच अनुभव दुबईमधल्या एका टॉवरमध्ये स्वयंपाक करतेवेळी तिच्या मदतीला आला आहे हेच ती अतिशय अभिमानानं सांगत आहे. 

 
 
 
 

View this post on Instagramआधी हाताला चटके तवा इंडक्शन वर भाकर .... रायगडावरच्या एका छोट्याशा झोपडीत चुलीवर भाकरी थापायला शिकले... “हिरकणी" साठीच्या training चा एक भाग म्हणून..... आता दुबईतल्या एका tower मधे तोच अनुभव कामी येतोय... कुठल्याही वयातलं कसलंही शिक्षण हे थोडे चटके देणारं असलं तरी सुखाची भाकर देणारंही असतंच...!!! #throwback #video #Hirkani #mondaymotivation #alwaysastudent #keeplearning #keepgrowing #teamwork

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणतंही शिक्षण हे थोडं चटके देणारं असलं तरीही सुखाची भाकर देणारंही असतं असा सुरेख संदेशही तिनं शेअर केला आहे. त्यामुळं तिचा हा व्हिडिओ पाहता खऱ्या अर्थानं अनुभवातूनच माणून मोठा होतो आणि सातत्यानं तो काहीतरी शिकतच असतो, हेच पुन्हा एकदा ध्यानी येत आहे.