ऑस्कर विजेती 'ही' अभिनेत्री पुन्हा होणार आज्जी...

 बॉलीवूडमध्ये सध्या बेबी बम्प प्रेग्नंन्सी असे शब्द ट्रेण्डिंग आहे. 

Updated: Oct 15, 2022, 07:31 PM IST
ऑस्कर विजेती 'ही' अभिनेत्री पुन्हा होणार आज्जी... title=

Meryl Streep To Be Grandmother: बॉलीवूडमध्ये सध्या बेबी बम्प प्रेग्नंन्सी असे शब्द ट्रेण्डिंग आहे. अनेक बॉलीवूड कपल्सच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. सध्या हा ट्रेण्ड झाला आहे आणि या ट्रेण्ड हॉलीवूडही चुकले नाहीये. सध्या अशाच एका दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री हॉलीवडूची सर्वात दिग्गज अभिनेत्री असून तिनं ऑक्सर हा मानांकित पुरस्कारही पटकावला आहे. (hollywood actress meryl streep going be grandmother again)

या अभिनेत्रीचं नावं आहे मेरिल स्ट्रीप. वयाच्या 73 व्या वर्षीही मेरिल यांनी तरूण प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. मेरिल स्ट्रीपची मुलगी ग्रेस गुमर पती मार्क रॉन्सनसह काही महिन्यांपुर्वीच विवाहबंध झाली. आता मेरिल स्ट्रीप यांची तिसरी मुलगी ग्रेस गुमर गरोदर असून आपल्या पहिल्या बाळाचं लवकरच स्वागत करणार आहे. ग्रेसनं आपला बेबी बम्प दाखवत ही गुड न्यूज दिली आहे. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

नुकत्याच एका मुलाखतीतून त्यांनी ही बातमी सांगितली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहेत मेरिल स्ट्रीप? 
मेरील स्ट्रीप यांनी 1977 मध्ये ज्युलिया या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांना 1978 मध्ये प्राइमटाइम एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर या चित्रपटातून मेरिल यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. मेरिलला 21 वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. त्यांना 3 वेळा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 32 वेळा गोल्डन ग्लोबल अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आणि 9 वेळा हा पुरस्कार त्यांनी जिंकला आहे. 

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

जेव्हा मेरिल स्ट्रीप यांची तुलना कंगनाशी झाली.. 
बॉलिवूड अभिनेत्रींचा सोशल मीडियावर जोरदार बोलबाला असतो. एका पोस्टमध्ये कंगनाने स्वत:ची तुलना हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि वंडरवूमन अभिनेत्री गॅल गॅडॉटशी केली होती. कंगनाने मेरिलशी स्वत:ची तुलना करताच ती प्रचंड ट्रोल झाली. कंगना राणौतने ट्विट करून याबद्दल लिहिले होते.