Enrique Iglesias Opps Moment! चाहतीने थेट स्टेजवर केलं लिपलॉक, Video व्हायरल

 अमेरिकन गायकाचा शोदरम्यान चाहतीसोबतचा किस घेतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल   

Updated: Sep 20, 2022, 02:07 PM IST
Enrique Iglesias Opps Moment! चाहतीने थेट स्टेजवर केलं लिपलॉक, Video व्हायरल   title=

 Enrique Iglesias kiss he Fan : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक Enrique Iglesiasचा एक व्हिडीओ (Enrique Iglesias Viral Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एनरिकच्या शोवेळी एक तरूणी फोटो काढण्यासाठी येते तेव्हा एनरिक तिला गालावर किस करतो. मात्र त्यानंतर जे काही होतं ते त्याने सर्वांनाच धक्का बसला. (Enrique Iglesias Kiss viral video with Female Fan Girl)

नक्की काय घडलं?
लास वेगस इथं फैंस संग मीट एंड ग्रीट सेशनच्या वेळी एक तरूणी एनरिकलासोबत फोटो घेण्यासाठी येते. त्यावेळी एनरिक तिच्या गालावर किस करतो. मात्र त्यानंतर ती चाहतीही एनरिकला किस करते मात्र ती डायरेक्ट लिप लॉक. तरूणी लिप लॉक किस घेत असताना त्याला सोडतच नाही त्यावेळी एनरिकलाही धक्का बसतो. (Enrique Iglesias Lip Lock Kiss Video)

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेवटी एनरिक काही वेळाने तिला सोडतो आणि तिथून पळ काढत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. एनरिक हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये एनरिकने म्हटलं आहे की, शुक्रवारी रात्री #LASVEGAS भेटूया आज रात्री  @resortsworldlv !!!! 

 

या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहते मुलीला नशिबवान म्हणत आहेत.एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'ती खूप नशिबवान .' तर काहींनी एनरिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मुलीला किस घेणं हे एनरिकनं बरोबर नाही केलं.