नव्या अंदाजात येतोय हॉलिवूडस्टार टॉम क्रुज

५७ व्या वर्षी टॉमचा नवा अंदाज 

Updated: Dec 19, 2019, 09:38 PM IST
नव्या अंदाजात येतोय हॉलिवूडस्टार टॉम क्रुज  title=

मुंबई : हॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता टॉम क्रुज. फक्त परदेशातच नव्हे तर, भारतातही त्याची चांगली लोकप्रियता आहे. त्याने आजवर ‘मिशन: इम्पॉसिबल’, ‘रेन मॅन’, ‘रिस्की बिझनेस’, ‘मंगोलिया’, ‘नाइट अ‍ॅण्ड डे’, ‘द लास्ट समुराई’ यांसारख्या अनेक एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये काम केलं. असा हा अभिनेता आता वयाच्या ५७ व्या वर्षी एका नव्या अंदाजात ‘टॉप गन: मेव्हरिक’ या ऍक्शनपॅक्ड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

हा अभिनेता त्याच्या अफलातून साहसदृश्यांसाठी ओळखला जातो. यावेळीसुद्धा तो त्याच्या चाहत्यांना निराश करणार नाही. ‘टॉप गन: मेव्हरिक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जबरदस्त अॅक्शन सीन्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये टॉम एका बाईकवरुन विमानाशी शर्यत करताना दिसतोय. हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन’चा सीक्वल आहे.

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

आता तब्बल ३४ वर्षानंतर सुपरहिट 'टॉप गन'चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘टॉप गन: मेव्हरिक’चं दिग्दर्शन जोसेफ कोसिन्की यांनी केलं आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२०मध्ये हा चित्रपट जुन महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मिती खर्चाविषयी सांगावं तर, १४० मिलियन डॉलर्स म्हणजेच ९६४ कोटी रुपयांच्या प्रचंड निर्मिती खर्चातून हा चित्रपट साकारण्यात आला आहे.