नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात स्वराची घोषणाबाजी; 'संघवाद पे हल्लाबोल...'

पाहा आक्रमक स्वरा..... 

Updated: Dec 19, 2019, 07:44 PM IST
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात स्वराची घोषणाबाजी; 'संघवाद पे हल्लाबोल...' title=
स्वरा भास्कर

मुंबई : CAA नागरिकत्व सुधारण्या कायद्याविरोधात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान इथे गुरुवारी सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येत निदर्शनं केली. यावेळी अभिनेत्री swara bhaskar  स्वरा भास्कर हिनेही यामध्ये सक्रीय सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. 

व्यासपीठावर उपस्थित राहत स्वराने तिची भूमिका मांडत आवेगात घोषणाबाजीही केली. 'संघवाद पे हल्लाबोल... हल्लाबोल हल्लाबोल...' असं म्हणत मनुवाद, दहशतवादय यांच्यासह तिने CAAवरही हल्लाबोलचीच भूमिका घेतली. 

'मै भी बोलू, तू भी बोल... हल्लाबोल हल्लाबोल', असं आवेगात म्हणणाऱ्या स्वराला यावेळी निदर्शनात सहभागी झालेल्यांनीही साथ दिली. या देशात सुरु असणारे तंटे, अशांततेचं वातावरण, महिलांवर होणारे अत्याचार आणि तरीही यामध्ये मौन असणारं सरकार या साऱ्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं असल्याचा सूर तिने आळवला. 

'ते दहशतवादी नव्हे, विद्यार्थी आहेत', जामिया प्रकरणी बॉलिवूडकरांचा संताप 

सोशल मीडियावरुन नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत इतक्यावरच शांत न राहता अनेक बॉलिवूड कलाकार खऱ्या अर्थाने कायद्याचा विरोध करत आंदोलकांच्या रुपात सर्वांसमोर आले. 'मला असं वाटत आहे, की ही फक्त अमुक एका गोष्टीचा विरोध करण्यासाठीच आयोजित करण्यात आलेली रॅली नाही. ही एका समर्थनाचीही रॅली आहे. संविधानाकडून मिळालेला आदर्श, देशातील बंधुभाव, धर्मनिरपेक्षता यासोबतच स्वातंत्र्यसेनानींच्या बलीदानाला सलाम करण्यासाठीची ही रॅली आहे', असं स्वरा म्हणाली. देशातील धर्मनिरपेक्षता कायम राहावी यासाठी आपण आशावादी असल्याची प्रतिक्रिया तिने आंदोलनादरम्यान दिली.