मुंबई: लता मंगेशकर यांच्या सुरांची जादू संपूर्ण देशावर आहे. लतादीदींचे अनेक किस्से आठवणी आणि गाणी कायम सर्वांच्याच स्मरणात राहातील. मात्र नागपूरविषयी त्यांचा असलेला द्वेष आणि तो हळूवारपणे घालवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले प्रयत्न अपार आहेत. गडकरींच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं होतं. नेमका तो किस्सा काय होता आणि नागपूरवर लतादीदींचा का राग होता आज त्याबद्दल जाणून घेऊया.
नागपूर हे अनेकांचं प्रेम आणि आवडतं स्थळ आहे. मात्र लतादीदींसाठी नागपूर म्हणजे राग असं समीकरण झालं होतं. तसा एक किस्सा त्यांच्या आयुष्यात घडला होता. त्यानंतर लतादीदी काहीशा नाराज आणि रागावल्या होत्या. त्यांची मनधरणी करणाऱ्याचा प्रयत्न बऱ्याचदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे महापौरांनी केला होता.
हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा हिंदी चित्रपटांमध्ये गाण्याची सुरुवात करून दीदींना अवघी 3 वर्ष झाली होती. त्यावेळी दीदींचं वय फक्त 21 वर्षे होतं. 1950 मध्ये नागपुरातील एका मैदानात लतादीदींच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नागपूरकरांमध्ये लतादीदींच्या आवाजाचं प्रचंड वेड होतं. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमली.
नागपुरात ऊन जास्त असल्याने लतादीदींना त्याचा त्रास झाला. त्रास झाल्यानंतर लतादीदींनी गाणार नाही असं सांगितलं. त्यांचा हा निर्णय ऐकल्यानंतर काही लोकांचा संताप अनावर झाला. दीदींच्या कार्यक्रमात दगड भिरकवला आणि त्यामुळे गोंधळ झाला होता. लतादीदींना या कृतीमुळे राग आला असावा. त्यानंतर त्यांनी पुन्हा नागपुरात कधीच कार्यक्रम करणार नाही असा मनोमन निश्चयच केला.
लतादीदींना पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसन्मान मिळाले. पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र नागपूरविषयी त्यांचा असलेला हा निश्चय मात्र कायम राहिला. हाच राग घालवण्यासाठी त्यावेळीच्या महापौर कुंदाताई विजयकर यांना 46 वर्षे प्रयत्न केले.
1995-96 मध्ये हृदयनाथ मंगेशकर यांच्यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांना नितीन गडकरी आणि कुंदाताई विजयकर यांनी गळ घातली की यावेळी लतादीदींना सोबत घेऊन या. हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींची अखेर समजूत काढली. त्यांनंतर संपूर्ण कुटुंब नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहिलं. त्यावेळी लतादीदींचाही सत्कार करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि लतादीदींचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे लतादीदींचा राग काढण्यात वेळ लागला पण अखेर यश मिळालं. लतादीदी शेवटपर्यंत नागपुरात एकट्या गायल्याच नाहीत. पण पसायदान म्हणताना त्यांना हृदयनाथ मंगेशकरांना साथ दिली. यामध्ये कुंदाताई विजयकर यांनी केलेली लतादीदींची मनधरणी अखेर यशस्वी ठरली.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.