हृतिक रोशन आणि कंगनाचा तो फोटो व्हायरल, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आज त्याचा  ४८वा वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: Jan 10, 2022, 03:53 PM IST
हृतिक रोशन आणि कंगनाचा तो फोटो व्हायरल, पाहून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आज त्याचा  ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. 2000 मध्ये आलेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतरच हृतिक रोशनने सुझान खानशी लग्न केलं. मात्र, 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. याआधी त्यांच्या घटस्फोटाचं कारण हृतिकचं कंगनासोबतचं अफेअर असल्याचं सांगितलं जात होतं. पण नंतर ती केवळ अफवा ठरली. हृतिक आणि कंगना यांनी 'काइट्स' आणि 'क्रिश 3' मध्ये एकत्र काम केलं आहे.

फोटो व्हायरल
यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. कंगनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला हृतिकने वचन दिलं होतं की, पत्नी सुझैनपासून वेगळे झाल्यानंतर तो तिच्याशी लग्न करेल. पण हृतिकने कंगनासोबत कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तो आणि कंगना बाहेर कधीच भेटले नाहीत. यानंतर कंगना आणि हृतिकचे वैयक्तिक फोटोही लीक झाले होते. या फोटोमध्ये हृतिकने कंगनाला मिठी मारल्याचं दिसत आहे. 

हृतिक रोशनला 2013 ते 2014 दरम्यान 100 ईमेल आले. हे ईमेल कंगना राणौतच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला 'सिली एक्स' म्हटल्यावर हृतिक आणि कंगना यांच्यात वाद सुरू झाला. यानंतर हृतिक रोशनने तिला कायदेशीर नोटीस पाठवली. आता त्याचा तपास क्राइम ब्रँच इंटेलिजन्स युनिट करत आहे.

काय होतं ईमेल्समध्ये
कंगनाने कथितरित्या पाठवलेल्या त्या मेल्समध्ये असं लिहिलं होतं, 'मला रोज सकाळी असे ईमेल पाठवण्याचा कंटाळा आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमचं नातं बिघडलं आहे. पण जेव्हा आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये येऊ तेव्हा परिस्थिती बदलू लागेल.  मी पूर्ण प्रयत्न करेन की, तुम्ही या रिलेशनशिपमुळे कंफर्टेबल असाल. जेव्हा आम्ही डेट करु तेव्हा तुम्हाला मेल वाटयला सोडू. मला आमच्या नात्यात पारदर्शकता हवी आहे.