मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये हृतिक रोशन हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्याचबोरबर त्याच्या हाताला पट्टी देखील दिसत आहे. बॉलिवूड सुपरस्टारची अशी अवस्था पाहिल्यानंतर त्याचे चाहते घाबरले आहेत. हृतिक रोशनचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागल्यामुळे चाहते चिंतेत आहेत.
मात्र घाबरण्यासारखं काहीच नाहीये. कारण, हृतिक रोशनची ही अवस्था का झालीये हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेता हृतिक रोशन रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. हृतिक रोशनने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितलं आहे की, ''मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलला रक्तदानासाठी मदत केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरावरुन हृतिकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या अभिनेत्रीला डेट करतोय हृतिक?
हृतिक रोशनका काहिदिवसांपुर्वी एका अभिनेत्रीसोबत एका रेस्टारंटच्या बाहेर स्पॉट झाला होता. या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. सोबत दिसलेल्या मुलीचं नाव सबा आझाद आहे. संगीतकार असण्यासोबतच ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन सबासोबत डिनरला गेला आणि जेव्हा तो रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होता. तेव्हा त्याला पापाराझींनी घेरलं. मात्र, हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत आहेत. की नाही याबद्दल काहीही माहिती अद्यापतरी समोर आली नाही.