पुन्हा एकदा लव्हबर्ड चर्चेत; हृतिक रोशन-सबा आझाद पॅरिसमध्ये स्पेंण्ड करतायेत क्वालिटी टाइम

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकमेकांसोबत डिनर डेटवर, तर कधी पार्ट्यांमध्ये स्पॉट होतात. 

Updated: Jul 8, 2022, 07:25 PM IST
 पुन्हा एकदा लव्हबर्ड चर्चेत; हृतिक रोशन-सबा आझाद पॅरिसमध्ये स्पेंण्ड करतायेत क्वालिटी टाइम title=

मुंबई : बॉलीवूडचं रूमर्ड कपल हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकमेकांसोबत डिनर डेटवर, तर कधी पार्ट्यांमध्ये स्पॉट होतात. मात्र, या  लव्ह बर्ड्सनी अद्यापही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. हृतिक रोशन आणि सबा आझाद सध्या पॅरिसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. तिथूनच त्यांच्या कॉफी डेटची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर, अलीकडेच सबा आझादने तिच्या इन्स्टा हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सबा तिच्या चेहऱ्यावर एक हात ठेवून बसलेली दिसत आहे. तिच्या समोर कॉफीचा कप ठेवला आहे आणि ती  पोज देत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हा सेल्फी नाही, माझी कॉफी नाही'.

हृतिक रोशनला टॅग करत तिने  फोटो क्रेडिट हृतिक रोशनला दिलं आहे. काही काळापूर्वी हे लव्हबर्ड्स करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये एकत्र आलं होतं. यावेळी या दोघांनी रेड कार्पेटवर जबरदस्त पोज दिल्या होत्या, तिथेच हृतिकने सबाची ओळख करून दिली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 हृतिक रोशन आणि सबा आझाद सोशल मीडियावर चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघं अनेकदा चर्चेत आले आहेत. बर्‍याचदा हृतिक त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सबाशी संबंधित काहीतरी पोस्ट शेअर करत असतो. तर दोघंही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. याशिवाय दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरलही झाले आहेत.