Hrithik Roshan च्या बहिणीचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आश्चर्यचकित 

 हृतिक रोशनसोबत दिसणारी ही गोंडस मुलगी तुम्हाला आठवते का?

Updated: Jan 15, 2022, 04:49 PM IST
Hrithik Roshan च्या बहिणीचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आश्चर्यचकित  title=

मुंबई : हृतिक रोशनसोबत दिसणारी ही गोंडस मुलगी तुम्हाला आठवते का? 'अग्निपथ' या सुपरहिट चित्रपटात हृतिक रोशनची बहीण बनून या मुलीने आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली होती. पण आता ही निरागस मुलगी सुंदर बनली आहे. अग्निपथनंतर कनिका तिवारी हिंदी चित्रपटांतून गायब झाली. मात्र ती कोण आहे आणि आता कशी दिसते हे तुम्हाला माहीत आहे का?

पहल्या सिनेमातून बनवली होती ओळख 
अभिनेत्री कनिका तिवारीने 'अग्निपथ'मध्येच आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली होती. 'अग्निपथ' हा कनिकाचा डेब्यू चित्रपट होता. 'अग्निपथ' चित्रपटात नेहमीच मौन बाळगणारी कनिका सध्या खूपच हॉट आणि ग्लॅमरस झाली आहे. 

साउथ सिनेमात फेमस आहे कनिका
बॉलिवूडमध्ये एकच चित्रपट केल्यानंतर कनिकाने तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं. आज ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. कनिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टिव्ही ऐक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठीची बहिण आहे कनिका
तुम्हाला आश्चर्य वाटेल की कनिका तिवारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची चुलत बहीण आहे. दोन्ही बहिणी एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात.