हमीद अन्सारींच्या वक्तव्यानंतर आता हुमा कुरेशी

हमीद अन्सारी यांनी भारतातील मुस्लीम असुरक्षित जीवन जगत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Updated: Aug 14, 2017, 10:43 AM IST
हमीद अन्सारींच्या वक्तव्यानंतर आता हुमा कुरेशी title=

मुंबई : भारतात आपण एकदम सुरक्षित आहोत, भारतात आपल्याला कुठल्याही प्रकारची कधीच असुरक्षितता जाणवत नाही, असं म्हणतेय अभिनेत्री हुमा कुरेशी. 

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भारतातील मुस्लीम असुरक्षित जीवन जगत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर हुमा कुरेशी हिने मांडलेलं आपलं रोखठोक मत महत्वाचं मानलं जातं आहे. 

आपण एक हिंदुस्थानी मुलगी आहोत आणि त्याचा आपल्याला अभिमान असल्याचंही हुमा कुरेशीने म्हटलंय. पार्टीशन 1947 या सिनेमातून हुमा कुरेशी पुन्हा एकदा एका वेगळ्या आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.