'मी पण वर्जिन नाहीये' मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा धक्कादायक खुलासा

मुंबईत जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली नेहा पेंडसे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. 

Updated: Jan 7, 2023, 07:59 PM IST
'मी पण वर्जिन नाहीये' मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) ला तिचे चाहते 'चंद्रमुखी चौटाला' या नावाने ओळखतात.  नेहा पेंडसे ही टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'एफआयआर' या लोकप्रिय कॉमेडी शो (comedy show) मुळे घराघरात पोहचलेली नेहा पेंडसे सध्या 'भाभी जी घर पर हैं' (bhabhi ji ghar par hai) मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारत आहे.  टीव्हीसोबतच तिने हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मुंबईत जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली नेहा पेंडसे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. जेव्हा तिने शार्दुल बियास (shardul biyas) सोबत लग्न केलं तेव्हा ती सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल झाली  नेहाच्या नवऱ्याचा आधी दोनदा घटस्फोट झाला आहे. ट्रोलर्सनी नेहा आणि शार्दुलला खूप ट्रोल केलं होतं. यावर नेहानेही चोख प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाली की, मला वाटतं की ट्रोलिंग कधीच थांबू शकत नाही, ट्रोल करणारे नेहमीच तुम्हाला ट्रोल करण्यासाठी काहीतरी कारण शोधतात. शार्दुलला त्याच्या पहिल्या पत्नीपासून २ मुलंही आहेत. 

ट्रोलिंगने काही फरक पडत नाही
'मी आणि माझा नवरा ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहोत. सुरुवातीला ट्रोलिंगचा माझ्या पतीवर परिणाम व्हायचा कारण त्याला या सर्व गोष्टींची सवय नव्हती, पण आता आम्हा दोघांनाही काही फरक पडत नाही. लोक तुमची तुलना करतील अशी माझी मानसिक तयारी झाली आहे. जरी याचा माझ्या कामगिरीवर कधीही परिणाम झाला नाही. असं नेहा म्हणाली. नेहाने पती शार्दुलला पाठिंबा देत तिचं वैयक्तिक आयुष्य लोकांसमोर उघड केल्यावर चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. 

'पुरुष माझ्यापासून पळू लागले होते'
नेहा पुढे म्हणाली, ' असं नाही की, मी ही वर्जिन आहे, मला या गोष्टीचं कौतूक वाटतं की, शार्दुलने अशा महिलेशी लग्नगाठ बांधली जिच्यावर त्याचं प्रेम आहे. माझ्या बाबतीत, पुरुष माझ्यापासून दूर पळू लागले होते, कारण जे नात लग्नापर्यंत जायला हवं होतं. निदान शार्दुलने आपलं वचन पाळलं तरी.

नेहाने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1999 मध्ये आलेल्या 'प्यार कोई खेल नहीं' या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. नंतर ती देवदास सारख्या चित्रपटात दिसली. 'कॅप्टन हाउस' या शोमधून तिची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली.