इलियानाने शेअर केले प्रियकरासोबतचे फोटोज...

सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्याबद्दल सगळ्यांनाच कुतुहूल असतं. बरेचदा अनेक सेलिब्रिटी आपले खाजगी आयुष्य मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 18, 2017, 03:13 PM IST
इलियानाने शेअर केले प्रियकरासोबतचे फोटोज... title=

नवी दिल्ली : सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्याबद्दल सगळ्यांनाच कुतुहूल असतं. बरेचदा अनेक सेलिब्रिटी आपले खाजगी आयुष्य मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, अभिनेत्री इलियाना डिक्रूजने या सेलिब्रिटींच्या भूमिकेला छेद देत अलीकडेच तिच्या प्रियकरासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिच्या त्या पोस्टमधून आयुष्यात ती खास व्यक्ती आल्याचा आनंद देखील प्रकट होत आहे. 

 

 always 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

इलियानाने २०१२ मध्ये 'बर्फी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सातत्याने 'मैं तेरा हीरो', 'रुस्तम', 'मुबारंका' या चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या भेटीला आली. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'बादशाहो' या चित्रपटात ती अजय देवगणसोबत दिसली. 

इलियानाचे प्रियकरासोबतच्या या फोटोतून त्यांची अफलातून केमिस्ट्री झळकते आहे. 

 

 

Shameless. & I refuse to change 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

सध्या इलियाना तिचा आगामी चित्रपट 'रेड' याच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. यात देखील अजय देवगणसोबत ती झळकणार असून हा चित्रपट पुढच्या वर्षी १६ मार्चला प्रदर्शित होईल. 

 

I love how we can be weirdos together 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x