किर्तनकार शिवलीला पाटील ट्रोलर्सच्या टार्गेटवर, म्हणाले- 'काय होतीस तू काय झालीस तू'

बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझन सुरु होवून नुकताच एक आठवडा झाला आहे.

Updated: Sep 29, 2021, 07:05 AM IST
किर्तनकार शिवलीला पाटील ट्रोलर्सच्या टार्गेटवर, म्हणाले- 'काय होतीस तू काय झालीस तू'

मुंबई : बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझन सुरु होवून नुकताच एक आठवडा झाला. मात्र या एका आठवड्यातच बिग बॉस मराठी चांगलच गाजला आहे. या शोमध्ये अगदी पहिल्या एपिसोडपासून या घरातील काही सद्स्य चर्चेत आले आहेत. या घरात कॉन्ट्रोवर्सी कपल ते कीर्तनकार असे अनेक स्पर्धक चर्चेत आहेत. सध्या या शोमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांची. सध्या शिवलीला पाटील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. सध्या शिवलीला यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या आधी शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शिवलीला पाटील महिलांबद्दल बोलत आहेत. या व्हिडीओमध्ये शिवलीला म्हणत आहेत की, आजकालच्या महिला पदर मागे सोडतात, केस मोकळे सोडून वावरतात. मात्र या व्हिडीओची तुलना आता त्यांच्या बिगबॉस मधील वागणुकीवर होत आहे. बिगबॉसमध्ये शिवलिला एका गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यात त्यांनी हातवर ओढणी सोडली आहे, त्याचबरोबर केसही मोकळे सोडले आहेत. त्यामुळे शिवलिला यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. 'जगा सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: कोरडे पाषाण' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचबरोबर बिग बॉसच्या घरातील स्पर्धकदेखील शिवलीला यांना ट्रोल करताना दिसले होते. बिगबॉसच्या घरातील गायक उत्कर्ष शिंदेने सुरुवातीलाच मीरासोबत केलेल्या गॉसिपमध्ये घरातील सदस्य किर्तनकार शिवलीला  पाटीलबद्दल गॉसिप केलं होतं. त्याच्या शब्दांची चांगलीच चर्चाही झाली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी तो म्हणाला होता की, ''तो शिवलीला आपल्या बाजूने वळवू शकतो. ती खूप साधी मुलगी आहे. तिला काहीच कळत नाही. तिला माऊली म्हटलं की, ती स्वत:ला देव समजते. तिला वाटत आपण देवी आहोत''. त्याचं हे वक्तव्य खूप चर्चेत आलं होत. जे वक्तव्य नंतर त्याला खूप महागातही पडलं होतं. यानंतर बिग बॉसच्या चाहत्यांनी त्याला चांगलच ट्रोल करत सुनावलं अनेकांनी उत्कर्षला तु असा कसा बोलू शकतोस असे प्रश्न उपस्थित केले होते.