रणबीरच्या वाढदिवशी आलियाकडून चाहत्यांसाठी गुडन्यूज प्रेमाची कबुली देत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. 

Updated: Sep 28, 2021, 10:03 PM IST
रणबीरच्या वाढदिवशी आलियाकडून चाहत्यांसाठी गुडन्यूज प्रेमाची कबुली देत म्हणाली...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही अनेकवेळा समोर आल्या आहेत, पण आतापर्यंत आलिया भट्टने सोशल मीडियावर उघडपणे तिच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. आता आलिया भट्टने पहिल्यांदाच फक्त रणबीर कपूरसोबत तिचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

आलियाने उघडपणे जाहीर केलं प्रेम  
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर समुद्र किनाऱ्यावर बसलेले दिसत आहेत. आलिया भट्ट रणबीरच्या खांद्याचा आधार घेऊन बसली आहे आणि दोघे मिळून मावळत्या सूर्याला पाहत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा हा रोमँटिक फोटो पाहून इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया भट्ट रणबीरला मानते आपलं आयुष्य 
फोटोचं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आलियाने कॅप्शनमध्ये जे काही लिहिलं आहे ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यात काय चालले आहे हे सांगण्यासाठी पुरेसं आहे. आज, रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी आलिया भट्टने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, Happy birthday my life. याचबरोबर आलियाने हार्ट ईमोजी देखील शेअर केले आहेत.