close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

करणच्या शोमध्ये भरणार 'स्टुडंट ऑफ द इअर 2'चा वर्ग

निर्माता करण जोहर होस्टेड शो 'कॉफी विथ करण'च्या पुढील भागात 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' सिनेमाचे कलाकार पाहुणे म्हणून येणार आहेत.

Updated: Feb 12, 2019, 12:19 PM IST
करणच्या शोमध्ये भरणार 'स्टुडंट ऑफ द इअर 2'चा वर्ग

मुंबई: निर्माता करण जोहर होस्टेड शो 'कॉफी विथ करण'च्या पुढील भागात 'स्टुडंट ऑफ द इअर 2' सिनेमाचे कलाकार पाहुणे म्हणून येणार आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारा आणि अनन्या पांडे शोमध्ये करण सोबत गप्पा-टप्पा करताना  दिसणार आहेत. 'स्टुडंट ऑफ द इअर 2' सिनेमाच्या माध्यमातून कोणते कलाकार मोठ्या पडद्यावर झळकतील यावर मागच्या वर्षीच शिक्कामोर्तब करण्यात आले. पण सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित होण्यास आणखी विलंब होणार आहे.

 

'स्टुडंट ऑफ द इअर 2'चा दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा यानं स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये टायगर श्रॉफ तारा सुतारा आणि अनन्या पांडे करण जोहरसोबत उभे असलेले दिसत आहेत. फोटो शेअर करत पुनीत मल्होत्रानं कॅप्शनमध्ये 'डीन तैयार हैं अपने नए स्टुडंटस् और कप के साथ' असे लिहले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Students at Koffee  @ananyapanday @tarasutaria__ @tigerjackieshroff @karanjohar #koffeewithkaran #student2

A post shared by Punit Malhotra (@punitdmalhotra) on

 

'स्टुडंट ऑफ द इअर 2' सिनेमासाठी करण जोहर, हीरू यश जोहर आणि अपूर्व मेहता विशेष मेहनत घेत आहेत. हा सिनेमा 2012 मध्ये आलेल्या 'स्टुडंट ऑफ द इअर' सिनेमाचा सीक्वल असणार आहे.