राजा रानीची गं जोडी: संजीवनी-रणजीतला का बदलावा लागला पेहराव?

 राजा रानीची गं जोडी या मालिकेनं सुरुवातीपासून मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केलाये. मालिकेतील रणजीत आणि संजीवनी ढाले-पाटील यांच्या संसारातील  चढ-उतार प्रेक्षक अगदी जवळून अनुभवत आहेत.

Updated: Aug 6, 2021, 07:36 AM IST
 राजा रानीची गं जोडी: संजीवनी-रणजीतला का बदलावा लागला पेहराव?

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या दररोजच्या मनोरंजनचं अफोर्डेबल पॅकेज. या मालिकांमध्ये दाखवला जाणारा ड्रामा प्रेक्षक चांगलेच एन्जॉय  करतात. त्यात सध्या राजा रानीची गं जोडी या मालिकेनं सुरुवातीपासून मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केलाये. मालिकेतील रणजीत आणि संजीवनी ढाले-पाटील यांच्या संसारातील  चढ-उतार प्रेक्षक अगदी जवळून अनुभवत आहेत.

नुकतीच ही जोडी अगदी हटके लूकमध्ये पहिल्यांदाच स्क्रिनवर रोमान्स करताना दिसली. निसर्गरम्य ठिकाणी संजीवनी आणि रणजीतचा हा हटके अंदाज प्रेक्षकांचं ही  लक्षवेधून घेणारा ठरला.

पण आता या मालिकेत ही जोडी खास राजस्थानी अंदाजात दिसणार आहे. संजीवनी आणि रणजीतचे काही राजस्थानी पेहरावातील फोटो समोर आले आहेत.

हे फोटो अनेकांना विचारात पाडणारे आहेत.

कोणत्या नव्या मिशनसाठी संजीवनी आणि रणजीतला असा पेहराव करावा लागलाये हे येणाऱ्या भागात कळेलच, सोबतच  हा लूक प्रेक्षकांना किती आवडतो ते देखील पाहणं उत्सुकतेच ठरेल.