close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नव्या ट्विस्टसह 'नच बलिए'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'नच बलिए ९' मधील स्पर्धकांच्या नावाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Updated: Jun 18, 2019, 03:42 PM IST
नव्या ट्विस्टसह 'नच बलिए'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो 'नच बलिए'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु यंदाचा 'नच बलिए' एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. 'नच बलिए' हा शो खऱ्या आयुष्यातील जोडीदारांवर आधारित असतो. परंतु 'नच बलिए'ची यंदाची थिम अतिशय खास आहे. यंदा शोमध्ये खऱ्या आयुष्यातील जोडीदार नाही तर एकमेकांचे एक्स लवर्स डान्स करणार आहेत. 'नच बलिए ९'चा प्रमो प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूड दबंग खान सलमान या शोचा निर्माता आहे. 

'कसोटी जिंदगी' मालिकेच्या पहिल्या पर्वातील 'कोमलिका' अर्थात उर्वशी ढोलकिया 'नच बलिए'च्या प्रमोमध्ये दिसत आहे. पण प्रमोमध्ये उर्वशीसोबत असलेल्या व्यक्तीचा चेहरा अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

उर्वशी ढोलकिया व्यतिरिक्त यंदाच्या  'नच बलिए ९' मध्ये कोणते कलाकार स्पर्धक सहभागी होणार, त्यांच्या नावांबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

'भारत' चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर 'नच बलिए' शोचं सूत्रसंचालन करणार आहेत. तर 'नच बलिए'साठी अभिनेत्री रविना टंडन परिक्षक असणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.