close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुरक्षा रक्षकांनाच संरक्षण देतोय सलमान

अखेर या गोष्टीची खात्री पटली आहे की...

Updated: Jun 18, 2019, 03:44 PM IST
सुरक्षा रक्षकांनाच संरक्षण देतोय सलमान

मुंबई : अभिनेता सलमान खान हा काही दिवसांपूर्वीच 'भारत' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पहिल्याच दिवसापासून त्याच्या लोकप्रियतेचा प्रत्यय चित्रपटाच्या एकंदर कमाईत पाहायला मिळाला. चित्रपटाच्या वाट्याला आलेलं हे यश पाहता सलमानने तमाम चाहत्यांचे आभारही मानले. ज्यानंतर आता हा दबंग खान पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन आयुष्यात रमल्याचं पाहायला मिळत आहे. 

सलमानने सोशल मीडियावर यासंबंधीचाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो व्यायाम करताना दिसत आहे. सलमानचं हे व्यायाम करणं त्याच्यासाठी अधिक खास ठरत आहे, कारण यात त्याला साथ मिळत आहे ती म्हणजे सुरक्षा रक्षकांची. 

व्यायामाच्या प्रकारांमध्ये लेग प्रेस करतेवेळी सलमानने त्याच्या व्यायामाच्या यंत्रावर सुरक्षा रक्षकांनाही बसवलं आहे. म्हणजे यंत्राचं वजन आणि त्याला जोड म्हणून मिळालेलं सुरक्षा रक्षकांचं वजन पाहता या साऱ्याचा भार भाईजान सलमान झेलत आहे. 

हा व्हिडिओ पोस्ट करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'अनेक चढउतारानंतर माझ्या सुरक्षा रक्षकांना अखेर या गोष्टीची खात्री पटली आहे की, के माध्यासोबत असताना कशा प्रकारे सुरक्षित असतात..... '. या कॅप्शनमध्ये तो मिश्किलपणे हसलाही आहे. त्यामुळे दबंग खानचा हा अंदाजही चाहत्यांची मनं जिंकत आहे. 

दैनंदिन कामांमध्ये वारंवार व्यग्र असतानाही सलमान त्याच्या शारीरिक सुदृढतेकडेही तितकंच लक्ष देतो. मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवणं असो किंवा मग व्यायाम आणि खाण्याच्या सवयी असो. सलमान नेहमीच या सर्व गोष्टींना प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतं.