Sukh Manje Nakki Kay Asta : गौरीवर शालिनीनं उचलला हात

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या चर्चेत आहे.

Updated: Sep 3, 2021, 11:30 AM IST
Sukh Manje Nakki Kay Asta : गौरीवर शालिनीनं उचलला हात title=

मुंबई : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील ड्रामा प्रेक्षक चांगलेच एन्जॉय करत आहेत. 
गौरीचा साधा-भोळा अंदाज ते जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला फार आवडते. टेलिव्हिजनवरील टॉप सिरीअल पैकी एक ही मालिका आहे.

पण प्रत्येक मालिका किंवा चित्रपट खलनायिकी पात्राशिवाय अर्धवट आहे. तसं या मालिकेत देखील खलनायिकेचं पात्र साकारणारी शालिनीचा सगळेच राग करतात. आता शालिनी तिच्या मर्यादा ओलांडत असं काही करणार हे जे पाहून प्रेक्षक देखील थक्क होतील.

 पूर्वीपासूनचं गौरी विरोधात प्लॅन करणारी शालिनी आता चांगलीचं भडकली आहे. या मालिकेमध्ये शालिनीने गौरीवर हात उचलला आहे. पण, गौरीने तिला रोखून धरलंय आता याचं भांडण टोकाला जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पण आता साधी, सरळ गौरी फार संतापली आहे. जयदीपच्या पाठिंब्यामुऴे गौरीमध्ये इतकी हिंमत आली आहे, असे शालिनीला वाटत आहे. शालिनीसोबत देवकी आणि ज्योतिका या दोघी आहेत. म्हणजेच, शालिनी, देवकी आणि ज्योतिका यांच्या विरोधात गौरी एकटी खंबीरपणे उभी आहे.

त्यामुळे येत्या काळात या शिर्के-पाटलांच्या घरात काय ड्रामा रंगणार हे पाहणं इंटरेस्ट्रींग ठरणार आहे.