Super Dancer 4 : सोनाली बेंद्रेवर का आली जुने कपडे घालण्याची वेळ?, होतेय ट्रोल

सोनाली या मंचावर गेस्ट म्हणून पोहोचली होती.

Updated: Aug 7, 2021, 10:11 AM IST
Super Dancer 4 : सोनाली  बेंद्रेवर का आली जुने कपडे घालण्याची वेळ?, होतेय ट्रोल

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेने ( Sonali Bendre) अलीकडेच एक फोटो शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो रिअॅलिटी डान्स शो सुपर डान्सर 4  च्या मंचावरील आहे. सोनाली या मंचावर गेस्ट म्हणून पोहोचली होती.

'सुपर डान्सर 4'मध्ये सोनाली बेंद्रे

यावेळी सोनालीने एक जॅकेट परिधान केले. ज्याच्या आठवणी 20 वर्षांच्या आहेत. होय, सोनालीने 20 वर्षां आधीचं जॅकेट परिधान केले होते. जे प्रसिद्ध डिझायनर  रोहित बाल यांनी डिझाइन केले होते. हे जॅकेट सोनालीने इतकी वर्षे ठेवले होते. मात्र, सुपरडान्सर 4 च्या शूटिंगमध्ये आलेल्या सोनालीने थ्रोबॅक फोटो शेअर करून या  जॅकेटबद्दल सांगितले.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनालीने एक अलीकडचा आणि 20 वर्षांचा फोटो शेअर केला आहे. या थ्रोबॅक फोटोमध्ये सोनालीसोबत डिझायनर्स रोहित  बाल आणि शाहरुख खान दिसत आहेत. 

सोनालीने या पोस्टसह कॅप्शन लिहिले आहे, 'काही गोष्टी जुन्या झाल्या की चांगल्या दिसतात. इथे मी माझ्या जॅकेटबद्दल बोलत आहे. 2 दशकांपूर्वी रोहित बालने  डिझाइन केलेले हे जबरदस्त जॅकेट मी परिधान केले होते, मला ते परत घालण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे! #विंटेज '. सोनालीच्या पोस्टवर तिला खूप  कमेंट्स येत आहेत.