विमानाचे डायरेक्ट 2 तुकडे झाले; 2024 या वर्षातील सर्वात भायनक अपघात

कझाकिस्तानमध्ये ज्या विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाला त्या कंपनीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 32 वर्ष जुन्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यु 5 कोटी रुपये देखील नाही. 

वनिता कांबळे | Updated: Dec 25, 2024, 06:07 PM IST
 विमानाचे डायरेक्ट 2 तुकडे झाले; 2024 या वर्षातील सर्वात भायनक अपघात  title=

Kazakhstan Plane Crash: 2024 या वर्षाच्या शेवटी अत्यंत भयानक अपघात झाला आहे. अझरबैजन एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. कझाकिस्तानमध्ये ही विमान दुर्घटना घडली आहे. विमानात 72 प्रवासी असल्याची माहिती समोर आली. या भीषण अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला आहे. लँडिंगच्या वेळी हा विमान अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. 

अझरबैजान एअरलाइन्सचे एम्ब्रेर E190AR हे विमान बाकूहून रशियाला जात होते. विमानात 67 प्रवासी होते. त्यापैकी 42 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 25 जणांना वाचावण्यात यश आले आहे. या अपघाताचा  व्हिडिओ समोर आला आहे. कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. विमान कोसळून त्याचे दोन तुकडे झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक पक्षी विमानाला धडकल्याने हा अपघात झाला. पक्षी विमाच्या इंजीनला धडकल्याने ऑक्सिजन सिलेंडर फुटला यामुळे वायू गळती झाली. व्हिडिओमध्ये दुर्घटनाग्रस्त विमान हवेत गिरक्या घेत खाली कोसळल्याचे दिसत आहे. 

हे देखील वाचा... 23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य, नाव ऐकून शॉक व्हाल, 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट

यापूर्वी देखील या कंपनीची अनेर विमान दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. ही कंपनी जवळपास 32 वर्षे जुनी आहे. या कंपनीचे 7 विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या कंपनीचे मार्केट कॅप 5 कोटी रुपयेही नाही.  7 एप्रिल 1992 रोजी अझरबैजान एअरलाइन्स कंपनी सुरू झाली.  या कंपनीची विमाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे करतात. कंपनीकडे 32 विमाने आहेत. यामध्ये एअरबस आणि बोइंग कंपनीच्या विमानांचा देखील समावेश आहे. कंपनीकडे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान देखील आहे. या विमानातून एकाच वेळी 200 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकतात. या विमान कंपनीचे मुख्यालय बाकू (अझरबैजान) येथे आहे. या कंपनीत जवळपास 7 हजार कर्मचारी काम करतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही एअरलाइन प्रवाशांसोबत मालवाहतुकीची सुविधाही पुरवते.या कंपनीच्या विमानांचा भारतासह जगातील अनेक देशांशी थेट संपर्क आहे.  दिल्ली आणि मुंबई या कपंनीच्या फ्लाईटची कनेट्कीव्हीटी आहे. नोव्हेंबर या कंपनीने 2022 मध्ये दिल्ली आणि मुंबईसाठी सेवा सुरू केली. दिल्ली आणि मुंबईसाठी आठवड्यातून दोनच दिवस उड्डाणे होतात.