कपिलचे प्रश्न गोविंदाला पडले भारी, पत्नीसमोर बोलती बंद

सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये नुकतीच गोविंदाने हजेरी लावली.

Updated: Sep 13, 2021, 10:59 AM IST
 कपिलचे प्रश्न गोविंदाला पडले भारी, पत्नीसमोर बोलती बंद

मुंबई : सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये नुकतीच गोविंदाने हजेरी लावली. यावेळी गोविंदा त्याच्यासोबत पत्नी सुनीता आणि मुलगी टीनासोबत आला आहे. गोविंदा या शोचा भाग बनण्याची ही पहिली वेळ नाही. अभिनेता या शोमध्ये अनेक वेळा दिसला आहे.

गोविंदाचे येथे स्वागत करण्यात आले, त्याचा भाचा कृष्णा अभिषेकने मात्र या भागात काम करण्यास नकार दिल्याचं समजतंय. शो दरम्यान कपिल शर्माने गोविंदाचा क्लास घेतला. या संपूर्ण कृती दरम्यान कपिलने गोविंदाला त्याची पत्नी सुनीताबद्दल असे प्रश्न विचारले की गोविंदाची बोलती बंद झाली.

कपिल शर्माने शो दरम्यान गोविंदाला विचारले की 'मला सांगा सुनीता मॅडमने कोणत्या रंगाचे कानातले घातले आहेत? कोणत्या रंगाचा नेल पेंट लावला जातो? कपिलच्या या सर्व प्रश्नांना गोविंदाने कोणतेही उत्तर दिले नाही. गोविंदाला कपिलच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. शेवटी गोविंदा पुढे म्हणाला, "सवाल पूछ रहा है या मेरी बैंड बजा रहा है?"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गोविंदाचे हे उत्तर ऐकून त्याची पत्नी सुनीताला खूप धक्का बसला आणि तिने कपिलला सांगितले की "यार कपिल, तू हे सर्व किस्से विचारत आहेस. तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सर्व उत्तर देते. सुनीता यांच्याकडून हे ऐकून कपिल शर्मा, गोविंदा आणि अर्चना पूरन सिंह मोठ्याने हसायला लागले.