प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी

सोनू सूदच्या घरी आयकर विभाग अधिका-यांकडून सर्वेक्षण

Updated: Sep 15, 2021, 04:42 PM IST
प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी

मुंबई: मनोरंजन विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. कोरोनामध्ये गरजूंसाठी देवासारख्या धावून येणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. कोरोनामध्ये अनेकांसाठी देवासारखा धावून येणारा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. सोनू सूदच्या घरी अधिकारी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

अभिनेता सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी सर्वेक्षण करत आहेत. आयकर विभागाशी संबंधित अनेक अधिकारी सोनू सूदच्या घरी पोहोचले आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक गरजूंना सोनू सूदने मदत केली होती. याशिवाय कोव्हिडसाठी देखील सोनू सूदने ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम केलं होतं. कलाकारांपासून ते गरजूंपर्यंत सोनू सूदने अनेकांना मदत केली आहे. 

बातमी अपडेट होत आहे.