बॉलिवूडचे सुपरस्टार आयकर अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

बॉलिवूडच्या दिग्गजांमागे IT आणि ED ची घरघर 

Updated: Mar 3, 2021, 01:31 PM IST
बॉलिवूडचे सुपरस्टार आयकर अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या घरावर आयकर विभागाचं लक्ष आहे. बॉलिवूडमधील तीन व्यक्तींच्या घरावर आय.टी विभागाने रेड टाकली आहे. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि निर्माता दिग्दर्शक विकास बहल यांचा समावेश आहे. या तिघांच्या घरावर आय टी विभागाची रेड टाकली आहे. 

दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरी आयटीचे छापे, मुंबईत अनेक ठिकाणी छापासत्र सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे. तसेच मधु मनटेना यांच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी Kwaan च्या कार्यालयावर देखील छापे मारण्यात आले आहेत. 

मिळालेल्या रिपोर्टनुसार विकास बहल, अनुराग कश्यप आणि मधु मेंटेना यांच्या घरावर छापा 'फँटम' सिनेमाच्या टॅक्स चोरी करता करण्यात आली आहे. हे तिघं या प्रोडक्शन हाऊसचे फाऊंडर आहेत. तर अनुराग कश्यप याचे मालक आहेत. 

फँटम फिल्म एक प्रायवेट एंटरटेन्मेंट कंपनी आहे. ज्याची स्थापना 2010मध्ये झाली आहे. या कंपनीचे फाऊंडर अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधू मंटेना आहेत. ही कंपनी फिल्म प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचं काम करते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x