Airstrike : भारतीय वायुदलाची कारवाई, बॉलिवूडमध्ये 'जय हो' चे नारे

पुलवामामध्ये झलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सिमा भगात घुसून कारवाई केली आहे. 

Updated: Feb 26, 2019, 12:52 PM IST
Airstrike : भारतीय वायुदलाची कारवाई, बॉलिवूडमध्ये 'जय हो' चे नारे title=

मुंबई : पुलवामामध्ये झलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सिमा भगात घुसून कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये जोरदार कारवाई केली आहे. भारतीय वायुदलाच्या १२ मिरज २००० विमानांनी पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणे उद्धवस्त केले आहेत. जैश आतंकवादी ठिकाणांवर वायुदलाने १ हजार किलो बॉम्ब टाकले. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत.

मंगळवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भारतीय वायुदलाने पकिस्तानी दहशत स्थळांवर ही कारवाई केली आहे. भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. सोशल मीडिच्या माध्यमातून ते आपले मत व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर, अजय देवगण, परेश रावल आणि कमल हसन यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद सांगितले आहे.

 

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेने  दहशवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हल्ल्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

 

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेने हा भयंकर हल्ला घडवून आणला. ज्यामुळे हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल अहमद दारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पाकिस्तानचा विरोध करण्यात आला सोबतच साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली.