Oscars 2022 : ऑस्करमध्ये भारताचा डंका, 'या' डॉक्यूमेंट्रीला नामांकन

बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या आणि पत्रकारितेवर आधारित असलेल्या भारतीय डॉक्यूमेंट्रीला ऑस्करमध्ये नामांकन  

Updated: Mar 28, 2022, 08:41 AM IST
Oscars 2022 : ऑस्करमध्ये भारताचा डंका, 'या' डॉक्यूमेंट्रीला नामांकन title=

मुंबई : लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोशात रंगत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी फक्त सेलिब्रिटींचं नाही तर  सामान्य नागरीक देखील उत्सुक असतात. दरम्यान, विजेत्यांच्या निवड प्रक्रियेत, 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या 9847 सदस्यांनी 276 सिनेमांसाठी मतदान केले.

2022 सालच्या पुरस्कार सोहळ्यात द पावर ऑफ द डॉगचा बोलबाला आहे. सिनेमाला 12 नामांकन मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे ऑस्करमध्ये भारत देखील पुढे आहे. भारताच्या ‘रायटिंग विद फायर’ डॉक्यूमेंट्रीला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे. 

या डॉक्यूमेंट्रीकडून आता देशाला अपेक्षा आहेत. ‘रायटिंग विद फायर’ डॉक्यूमेंट्री पत्रकारितेवर आधारित आहे. ज्याला ऑस्कर 2022 साठी नामांकन मिळाले आहे. या डॉक्यूमेंट्रीला यापूर्वी सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रायटिंग विद फायर’ डॉक्यूमेंट्रीने आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. आपल काम करत असताना पत्रकाराच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींभोवती डॉक्यूमेंट्री फिरताना दिसत आहे. 

‘रायटिंग विद फायर’ डॉक्यूमेंट्रीचं दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष. दोघांच्या करियरमधील ही पहिली डॉक्यूमेंट्री आहे.