Oscars 2023 Winners: ऑस्करविजेत्या The Elephant Whisperers मधून मांडलीये असामान्य कथा, पाहा VIDEO

Oscars 2023 Winners: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीत भारतातूनही यंदा अनेक कलाकृतींची वर्णी लागली. यातूनच द एलिफंच व्हिस्परर्स या माहितीपटाला यंदाचा ऑस्कर मिळाला. 

Updated: Mar 13, 2023, 08:10 AM IST
Oscars 2023 Winners: ऑस्करविजेत्या The Elephant Whisperers मधून मांडलीये असामान्य कथा, पाहा VIDEO  title=
Academy awards, 95th academy awards, the elephant whisperers, the elephant whisperers enter oscars 2023, oscars 2023, oscars awards, the elephant whisperers shortlist for 95th academy, he elephant whisperers based on a south indian cou

The Elephant Whisperers wins Oscars 2023 : ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारत भारताच्या The Elephant Whisperers  या माहितीपटानं ऑस्कर पटकावला आणि क्षणार्धातच या माहितीपटाला साकारणाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. क्षणातच सोशल मीडिया ट्रेंड बदलले आणि प्रत्येक जण या माहितीपटाविषयी सर्च करु लागला. हा विषय नेमका काय, त्यामध्ये कोणता मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे, याबाबतची सर्व माहिती इंटरनेटवर तुफान शोधली जाऊ लागली. कार्तिकी गोंसालवीस आणि गुनीत मोंगा यांनी साकारलेल्या या माहितीपटानं जागतिक स्तरावर मिळवलेलं हे यश अद्वितीय आहे. याचनिमित्तानं पाहा या माहितीपटाची एक झलक... 

माहितीपटातून उलगडलीये कमाल गोष्ट... 

'द एलिफंट व्हिस्परर्स'ची कहाणी अतिशय असामान्य असून, यामध्ये मनुष्य आणि प्राणी यांच्यातील नातं हळुवारपणे उलगडून सांगण्यात आलं आहे. एक दाक्षिणात्य जोडपं अनाथ हत्ती (रघू)ची जबाबदारी घेतं आणि त्याला वाचवण्यासाठी जी मेहनत करतं यावर माहितीपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. कार्तिकी गोंसालवीसच्या दिग्दर्शनाका साकारलेल्या या माहितीपटाची निर्मिती सिख्या एंटरटेनमेंटनं केली आहे. 

दक्षिण भारतातील वनांचं एक वेगळं आणि तितकंच व्यापक रुप या माहितीपटातून पाहायला मिळत आहे. एका हत्तीला मिळालेला देवाचा दर्जा आणि त्यानं सुरु असणारा सुरेख प्रवास या माहितीपटातून उलगडला गेला आहे. नेटफ्लिस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा माहितीपट तुम्हीही पाहू शकता. 

हेसुद्धा वाचा : Oscars 2023 LIVE Updates: भारताला मिळाला पहिला ऑस्कर; 'द एलिफेंट विस्पर्स' या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री अवॉर्ड

 

दरम्यान, या माहितीपटासाठीचा ऑस्कर स्वीकारल्यानंतर गुनीत मोंगानं आनंद व्यक्त केला. या विभागात भारताला मिळालेला हा पहिलाच ऑस्कर असल्याचं म्हणत तिनं महिलांना स्वप्न पाहण्याचा संदेशही दिला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंदच सर्वकाही सांगून गेला. 

ऑस्कर सोहळ्याची रंगत....

एकिकडे ऑस्करमध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असतानाच दुसरीकडे या सोहळ्याला चार चाँद लावले ते म्हणजे 'नाटू नाटू' या गाण्यानं आणि त्यावर सादर करण्यात आलेल्या परफॉर्मन्सनं. 'आरआरआर' या चित्रपटातील या गाण्यावर ऑस्कर सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स सादर करण्यात आला ज्यावर संपूर्ण हॉलिवूड थिरकलं. 

आणखी एक रंजक बाब म्हणजे मार्वल चित्रपट ब्लॅक पँथर वकांडा फॉरेवरमधील गाण्यावर पॉप सिंगर रिहानाचा अफलातून परफॉर्मन्स. गरोदर असतानाही तिनं दिलेला हा परफॉर्मन्स पाहून तिथं असणारे सर्वजण भारावले.