Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या 'नाटू नाटू' चा ऑस्‍करमध्ये डंका, बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार

Oscars 2023 Academy Awards: ऑस्कर अकादमी पुरस्कार लवकरच सुरु होणार आहे. अशात भारतीयांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. यंदा भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. त्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अवॉर्ड प्रेझेंट करताना आपल्याला दिसणार आहे. 

Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या 'नाटू नाटू' चा ऑस्‍करमध्ये डंका, बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार

Oscars 2023 Academy Awards Live Updates: यंदाच्या वर्षीचं ऑस्कर अकादमी पुरस्कार 2023 आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. भारतीय तर ऑस्कर 2023 साठी प्रचंड उत्सुक आहेत. ऑस्कर अमेरिकेच्या लॉस एंजलिस येथे सुरु होणार आहे. भारतीयांसाठी यंदाचं वर्षे खूप खास आहे, कारण एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाच्या 'नाटु नाटु' या गाण्याला ऑरिजनल सॉन्ग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. तर त्यासोबतच 'ऑल दॅट ब्रीथ' या चित्रपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री कॅटेगरीत आणि 'द एलिफेंट विस्पर्स' या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्मसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. (Oscars 2023 Indian Films)  दरम्यान, यासोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यावेळी अवॉर्ड प्रेझेंट करतानाही आपल्याला दिसणार आहे. दीपिका आधी प्रियांका चोप्रानं 2016 (Priyanka Chopra) आणि 1980 मध्ये पर्सिस खंबाटानंतर आता अवॉर्ड प्रेझेंट करणारी दीपिका तिसरी भारतीय असणार आहे. चला तर जाणून घेऊया ऑस्करच्या लाइव्ह अपडेट्स... 

13 Mar 2023, 08:32 वाजता

Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार 

13 Mar 2023, 08:12 वाजता

Oscars 2023: Avatar ने पटकवला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअ इफेक्टचा पुरस्कार
 
भारतात रिलीज झालेल्या अवतार 2 सिनेमाने Best Visual Effects पुरस्कार पटकवला आहे. 

13 Mar 2023, 07:49 वाजता

राम चरणची पत्नी उपासनानं शेअर केले ऑस्करमधील खास फोटो शेअर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

13 Mar 2023, 07:44 वाजता

Oscars 2023: बेस्ट ओरिजनल स्कोअर
'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट' (All Quiet on the Western Front) चित्रपटाला मिळाला Best Original Score चा पुरस्कार

13 Mar 2023, 07:34 वाजता

Oscars 2023: बेस्ट प्रोडक्शन डिजाइन
All Quiet on the Western Front या चित्रपटाला बेस्ट प्रोडक्शन डिजाइनचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याआधी बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. 

 

13 Mar 2023, 07:31 वाजता

Oscars 2023: बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ड फिल्म
'द बॉय, द मोल, द फॉक्स अ‍ॅड द हॉर्सनं' (The Boy, the Mole, the Fox, and the Horse) बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

13 Mar 2023, 07:27 वाजता

Oscars 2023: Natu Natu गाण्याला मिळालं स्टॅंडिंग ओव्हेशन

13 Mar 2023, 07:22 वाजता

Oscars 2023: भारताला मिळाला पहिला ऑस्कर
'द एलिफेंट विस्पर्स' या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. 

13 Mar 2023, 07:15 वाजता

Oscars 2023: बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म
'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट' (All Quiet on the Western Front) चित्रपटाला मिळाला इंटरनॅशल फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार

13 Mar 2023, 07:12 वाजता

पाहा नाटू-नाटूचा पर्फॉर्मंस