Indian Idol 12 : 'काही अडचण होती तर अगोदर बोलायला हवं होतं', अमित कुमार यांच्या वक्तव्यावर आदित्य हैराण

किशोर कुमार यांची 100 गाणी गाऊन वाहिली श्रद्धांजली 

Updated: May 14, 2021, 08:25 AM IST
Indian Idol 12 : 'काही अडचण होती तर अगोदर बोलायला हवं होतं', अमित कुमार यांच्या वक्तव्यावर आदित्य हैराण

मुंबई : लोकप्रिय रिऍलिटी शो Indian Idol 12 मध्ये किशोर कुमार स्पेशल एपिसोड करण्यात आला. या एपिसोडनंतर किशोर कुमार यांचे मुलगे अमित कुमार यांनी केलेल्या वक्तव्याची खूप चर्चा झाली. (Indian Idol 12 Host Aditya Narayan Reacts to Kishore Kumar Son Amit Kumar Criticism of the Present Judges ) 'मला सगळ्यांचं कौतुक करण्यास सांगितलं. कुणीही कसंही गायलं तरीही. स्पर्धकांचं कौतुक करण्याचे मला पैसे मिळाले.' त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर इंडियन आयडलचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाला आदित्य नारायण?

आदित्य नारायण म्हणाला की,'जर अमित कुमार यांना काही गोष्टींची अडचण होती किंवा काही गोष्टी आवडल्या नव्हत्या. त्यांना काही तक्रार होती तर अगोदरच सांगायला हवं होतं.' आदित्य या गोष्टीने हैराण झाला की, अमित कुमार यांना कोणती अडचण होती तर ते एपिसोडच्या शुटिंग दरम्यान बोलू शकले असते. (स्पर्धकांचं कौतुक करण्याचे मिळतात पैसे? Indian Idolबाबत धक्कादायक खुलासा) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ANU MALIK (@anumalikmusic)

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

 'इंडियन आयडल 12' मध्ये किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. या एपिसोडमध्ये अमित कुमार पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धक आणि परिक्षक यांनी मिळून किशोर कुमार यांची 100 गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Indian Idol 12 : Kishore Kumar Episode Son Amit Kumar Says did it for Money ) मात्र प्रेक्षकांना हा कार्यक्रम रुचला नाही. काही युझर्सने परिक्षकांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. नुकतंच अमित कुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. ते फक्त स्पर्धकांचं कौतुक करायला आणि त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशाकरता कार्यक्रमात गेले होते. 

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,'मी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो की, प्रेक्षक या एपिसोडबद्दल खूप बरं-वाईट बोलत आहेत.' त्यांना स्पर्धकांच कौतुक करायला आणलं होतं. मग ते कसे पण गाऊ देत. या एपिसोडमध्ये स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी पैसे देण्यात आले.